रमा बिपिन मेधावी
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
पंडिता रमाबाई सरस्वती (२३ एप्रिल, इ.स. १८५८ - ५ एप्रिल, इ.स. १९२२) या परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या.
भारतीय समाज सुधारक | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
जन्म तारीख | एप्रिल २३, इ.स. १८५८ मंगळूर (मद्रास प्रांत, ब्रिटिश राज) |
---|---|
मृत्यू तारीख | एप्रिल ५, इ.स. १९२२ केडगाव (दौंड) (बॉम्बे प्रांत, ब्रिटिश राज) |
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
नागरिकत्व | |
व्यवसाय |
|
रमा बिपिन (डोंगरे) मेधावी [१] | |
---|---|
टोपणनाव: | पंडिता रमाबाई सरस्वती |
जन्म: | २३ एप्रिल, इ.स. १८५८ |
मृत्यू: | ५ एप्रिल, १९२२ (वय ६३) |
चळवळ: | स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा |
वडील: | अनंतशास्त्री डोंगरे |
आई: | लक्ष्मीबाई डोंगरे |
पती: | बिपिन बिहारीदास मेधावी |
अपत्ये: | मनोरमा |
बालपण
संपादनपंडिता रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते[ संदर्भ हवा ], स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्या काळात रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली.[ संदर्भ हवा ] रमाबाई १७-१८ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.
मुलींना तर बाहेर पडणे शक्यही नव्हते. त्या काळात अनंतशास्त्र्यांनी मुलीला संस्कृत शिकवले. त्यामुळेच पौराणिक संस्कृतात ही मुलगी पारंगत झाली. फक्त शिक्षण देऊन थांबवले नाही, तर मुलीवर लग्नासाठी दबावही आणला नाही. उलट शक्य तेवढे ज्ञान ग्रहण कर असा उपदेशच केला.[ संदर्भ हवा ] रमाबाईंवरचा हा उदारमतवादी पिता मात्र जास्त काळ जगू शकला नाही. रमाबाई सोळा वर्षाच्या असतानाच अनंतशास्त्री वारले. त्यांची पत्नीही गेली. रमाबाई आणि त्यांच्या भावाला आता कुणीही नव्हते.
मातृपितृछत्र हरपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ बंधूंसह भ्रमण करत त्या कोलकत्याला पोहोचल्या. रमाबाईंना आई-वडिलांकडून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला. त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या.[ संदर्भ हवा ]
विवाह आणि समाजकार्य
संपादनइ.स. १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलांशी लग्न केले. पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते.[ संदर्भ हवा ] पण रमाबाईंनी चुकीच्या रूढींना झुगारून देण्याचेच ठरवले होते. दुर्दैवाने इ.स. १८८२ मध्ये मेधावी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या. बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर अहमदनगर,सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी ‘आर्य महिला समाजाची स्थापना केली. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक लिहिले. इ.स. १८८३ साली त्या आर्य महिला समाजाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या. परंतु तेथे एका महिला महाविद्यालयात (चेल्टनहॅम लेडीज कॉलेज) त्यांनी संस्कृत शिकवले.[ संदर्भ हवा ] १८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक कार्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या परंतुप्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी भारतातील समस्या तेथील लोकांसमोर मांडल्या. भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती. पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले.[ संदर्भ हवा ]
१८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवासखर्च त्यांनी स्त्रीधर्मनीती हया पुस्तकाताच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वॉटिंज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोणामुळे तसेच भूतदया व प्रेमाचे शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामतः २९ संप्टेंबर १८८३ रोजी वॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.[ संदर्भ हवा ]
११ मार्च, इ.स. १८८९ रोजी त्यांनी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली.[२] त्यांनी केशवपनाविरुद्धही प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीसही पाठिंबा दिला. इ.स. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदन’ पुण्यात आणले गेले.[ संदर्भ हवा ] २४ सप्टेंबर, इ.स. १८९८ रोजी केडगाव येथे ‘मुक्तिसदना’ची त्यांनी स्थापना केली. इ.स. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व इ.स. १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन'(अपंग व दुबळ्या साठी)‘शारदासदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून गरजू व पीडित स्त्रिया राहत असत. या सदनांत दुर्दैवी स्त्रियांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांनी आपल्या आश्रमातील-सदनांतील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम यांसह शालेय शिक्षणही देण्याचा प्रयत्न केला.[ संदर्भ हवा ]
आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईनी शारीरिक श्रमाचे महत्त्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. ’मुक्तिसदना'त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या मदतीने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता सायं घरकुलाची व्यवस्था त्यांनी केली.[ संदर्भ हवा ]
याच काळात त्यांनी वंचित, पीडित स्त्रियांसाठी काम करणे सुरू केले होते. या सगळ्या परिस्थितीत रमाबाईंनी पुण्यात विधवा आणि अनाथ महिलांसाठी आश्रम काढला. नंतर मुंबईतही तो सुरू केला. या केंद्रांत महिलांना मूलभूत शिक्षण देण्यात येई. शिवाय समाजात रहाण्यासाठी आवश्यक व्यावसायिक शिक्षणही त्यांना देण्यात येई. अल्पावधीतच रमाबाई वंचित, पीडित महिलांच्या जणू वकीलच बनून गेल्या.[ संदर्भ हवा ]
त्यांच्या या समाजकार्यातच त्यांचा ख्रिस्ती मिशनऱ्यांशी संबंध आला. त्यांच्या मदतीने १८८३ मध्ये रमाबाईंना इंग्लंडला जायची संधी मिळाली. तिथे गेल्यानंतर तेथील स्त्रियांची स्थिती त्यांनी पाहिली. हिंदू रूढीवादी मानसिकतेत स्त्रियांचा होत असलेला संकोच त्यांना प्रकर्षाने जाणवला. त्यावर आधारीत त्यांनी उच्च जातीतील हिंदू स्त्रिया नावाचे पुस्तकही लिहिले. त्याचा अनुवाद इंग्रजीत होऊन त्याचा प्रसार इंग्लंड-अमेरिकेत झाला. त्याचवेळी त्यांनी बायबलचाही अभ्यास सुरू केला. आणि याचाच परिणाम म्हणून त्यांनी ख्रिश्चन धर्म अंगीकारला. त्यांच्या धर्मांतराने तत्कालीन सनातनी समाजात मोठी खळबळ उडाली. टीकेचा भडिमार झाला. पण रमाबाईंनी आपल्या धर्मांतराचे समर्थन केले.
मुंबईत शारदासदन आणि केडगावला मुक्तीमिशन या त्यांच्या संस्था. एकीकडे त्यांच्या समाजसुधारणेचे आयाम विस्तारत असताना त्यांनी ज्या ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला,[ तारीख?]
रमाबाई ख्रिश्चन धर्मात आल्या तरी त्या ज्यांच्यासाठी काम करत होत्या, त्या महिलांनी ख्रिश्चन धर्मात यावे यासाठी त्या काहीही करत नव्हत्या. सत्य तुम्हा समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करील बायबल मधील या वचनानुसार पंडिता रमाबाई ज्या स्त्रियांसाठी काम करत होत्या त्या स्त्रियांना सांगितलेल्या ख्रिस्ताच्या सुवार्ता वर विश्वास ठेवून या स्त्रिया ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करीत होत्या रमाबाईंचे धर्मांतरण हे दांभिक आहे, अशी टीका करण्यास त्यांनी सुरुवात केली.[ संदर्भ हवा ]
रमाबाईंनी बिशप वगैरे परंपराही नाकारली. त्यामुळे त्यांचा अधिकच भडका उडाला. त्यावर रमाबाईंचे म्हणणे स्पष्ट होते. मी ख्रिस्ताच्या चर्चची खरी भाविक आहे. पण बिशप किंवा ख्रिस्ती पुजाऱ्याच्या तोंडून येणाऱ्या प्रत्येक शब्दाचे पालन करण्यास मी बांधील नाही. कारण हिंदू संस्कृतीतील भिक्षुक पुरोहित संस्कृतीतून स्वतःला मी सोडवून घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या भिक्षुक संस्कृतीत स्वतःला अडकविण्याची माझी इच्छा नाही.[ संदर्भ हवा ]
महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचेच प्रयत्न होते. [ संदर्भ हवा ]‘पाचवारी साडी नेसणे सहज, सोपे आहे, सुसह्य आहे व आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे.’ या विषयावर इ.स. १८९१ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते.[ संदर्भ हवा ] त्या काळात स्त्रियांच्या वेशात ‘हा’ बदल करणेही त्यांना खूप अवघड गेले होते. पण रमाबाईंनी ही चळवळ चालूच ठेवली. तो केवळ कपड्यांचा मुद्दा नव्हता, तर स्त्री-स्वातंत्र्य, स्वयंनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.[ संदर्भ हवा ]
अशा या थोर विदुषीला इ.स. १९१९ साली त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन ब्रिटिश राज्यव्यवस्थेतील सर्वोच्च पुरस्कार कैसर-ए-हिंदने गौरविण्यात आले. ‘कैसर-ए-हिंद’ हे सुवर्णपदक होते. पुढे १९८९ मध्ये त्यांच्यावर टपाल तिकीटही काढण्यात आले. स्त्री-शिक्षण, स्त्रियांचे समाजासमोर येणे, कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गोष्टी फारशा प्रचलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न आदी क्षेत्रांत भारतासह परदेशांतही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा व कार्याचा ठसा उमटवला. प्रखर बुद्धिमत्ता, अपार कष्ट, धाडस इत्यादी गुणांसह समाजसुधारणा क्षेत्रात एक उत्तम वस्तुपाठ समाजासमोर ठेवणाऱ्या पंडिता रमाबाई यांचे इ.स. १९२२ मध्ये केडगाव येथे निधन झाले.[ संदर्भ हवा ]
चरित्रग्रंथ
संपादन- पंडिता रमाबाई सरस्वती (चरित्र : लेखक - प्रबोधनकार ठाकरे) [ संदर्भ हवा ]
- महाराष्ट्राचे शिल्पकार पंडिता रमाबाई : लेखिका : श्रीमती सिसिलीया कार्व्हालो. (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)[ संदर्भ हवा ]
पुरस्कार
संपादन- पुण्याच्या माझी मैत्रीण चॅरिटेबल ट्रस्टचा पंडिता रमाबाई पुरस्कार : २०१६ साली हा पुरस्कार सांगलीच्या वीमन्स एज्युकेशन सोसायटीला मिळाला.स्त्रियांच्या सबलीकरणाचे कार्य करीत असलेल्या सामाजिक संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. पहा - www.majhimaitrin.in [ संदर्भ हवा ]
- पुण्याच्या माझी मैत्रीण चॅरिटेबल ट्रस्टचा पंडिता रमाबाई पुरस्कार २००४ साली भगिनी निवेदिता संस्थेला प्रदान झाला.स्त्रियांच्या सबलीकरणाचे कार्य करीत असलेल्या सामाजिक संस्थेला हा पुरस्कार दिला जातो.[ संदर्भ हवा ]
• अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने पंडिता रमाबाई सेवारत्न पुरस्कार हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. महिला व बालकल्याणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ https://archive.org/stream/highcastehinduwo00ramaiala#page/n5/mode/2up
- ^ अनुपमा उजगरे. पंडिता रमाबाई : 'धर्मांतर केल्यामुळेच दुर्लक्षित राहिल्या का?'. BBC News मराठी. 07-04-2018 रोजी पाहिले.
रमाबाईंनी शारदासदन या संस्थेची स्थापना 11 मार्च 1889रोजी मुंबईत विल्सन कॉलेजजवळ 169, गिरगाव चौपाटी जवळच्या एका भाड्याच्या घरात केली. त्यासाठी त्यांना अमेरिकेतून रमाबाई असोसिएशननं दहा वर्षं 15 हजार आर्थिक मदत पुरवली.सुरुवातीला शारदा सदनात 18 विधवा होत्या.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)