पंकज जोशी
पंकज जोशी (२५ एप्रिल १९५३:भावनगर, गुजरात, भारत - ) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ आहेत. यांचे संशोधन मुख्यत्वे गुरुत्वाकर्षण संकुचित आणि नग्न एकलता या क्षेत्रांवर केंद्रित आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये त्यांचे २०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. जोशी सध्या चरोतर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात प्रोव्होस्ट म्हणून कार्यरत आहेत.[१][२]
मागील जीवन आणि कारकीर्द
संपादनजोशी यांचा जन्म भावनगर, गुजरात येथे २५ एप्रिल १९५३ रोजी झाला. त्यांनी बी.एस्सी. पदवी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, महाराजा कृष्णकुमारिंहजी भावनगर विद्यापीठ येथून घेतली तर एम.एससी.ची पदवी राजकोटच्या सौराष्ट्र विद्यापीठाच्या गणित विभागातून घेतली. सौराष्ट्र विद्यापीठातूनच जोशी यांनी पीएच.डी. पदवी १९७९ मध्ये सामान्य सापेक्षतेतील कार्यकारणभावाचा अभ्यास या या विषयावर घेतली.[३]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
डॉक्टरेटच्या कामानंतर ते मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये व्हिजिटिंग फेलो म्हणून रुजू झाले. त्यांनी , मुंबई येथे १९७९ ते २०१८ पर्यंत अनेक पदे भूषवली. जोशी यांनी २०१० ते २०१२ पर्यंत इंडियन असोसिएशन ऑफ जनरल रिलेटिव्हिटी अँड ग्रॅव्हिटेशन येथे अध्यक्ष म्हणून काम केले. सध्या ते गुजरात सायन्स अकादमीचे अध्यक्ष आहेत.[४]
पुरस्कार आणि सन्मान
संपादन- द वर्ल्ड अकॅडमि ऑफ सायन्सेस, २०२१ चा फेलो निवडला गेला
- आयएनएसए वैनू बाप्पू पुरस्कार, २०२०
- इंडियन नॅशनल सायन अकादमी, २०१३ चे फेलो निवडले गेले
- नॅशनल अकॅडमि ऑफ सायन्सेस इंडिया, २००६ चे फेलो निवडले गेले
- ग्रॅव्हिटी रिसर्च फाउंडेशन (यूएसए) चा फायनल फेट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स, १९९१ वर संशोधनासाठी पुरस्कार
- नॅशनल अकॅडमि ऑफ सायन्सेस तर्फे प्रो.ए.सी. बॅनर्जी सुवर्ण पदक आणि मेमोरियल लेक्चर पुरस्कार
- अणुऊर्जा विभाग तर्फे सी व्ही रमण व्याख्यान पुरस्कार
संदर्भ
संपादन- ^ Aug 20, Bharat Yagnik / TNN /; 2020; Ist, 14:35. "Gujarat: Pankaj Joshi receives Vainu Bappu award | Ahmedabad News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-08-18 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "Prof. Pankaj Joshi receives INSA - Vainu Bappu Award". Gujarat Science Academy (इंग्रजी भाषेत). 2020-08-20. 2022-08-18 रोजी पाहिले.
- ^ May 14, Prashant Rupera / TNN /; 2018; Ist, 12:22. "Dr Pankaj Joshi takes over as provost of CHARUSAT - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-08-18 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Dec 18, TNN / Updated:; 2020; Ist, 07:38. "Gujarat black hole scientist elected TWAS fellow | Vadodara News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-08-18 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)