न्यूस्पेस इंडिया लिमिटेड

न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) ही भारत सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्त्रो) व्यावसायिक शाखा आहे. हे अंतराळ विभाग आणि कंपनी कायदा २०१३ च्या प्रशासकीय नियंत्रणाखाली ६ मार्च २०१९ रोजी स्थापित केले गेले. न्यू स्पेस इंडियाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे भारतीय अंतराळ कार्यक्रमांमध्ये उद्योगातील सहभाग वाढवणे. []

न्यूस्पेस इंडिया लिमिटेड
प्रकार सरकारी क्षेत्र उपक्रम
स्थापना 6 मार्च 2019; 5 वर्षां पूर्वी (2019-०३-06) []
मुख्यालय बंगळूर, कर्नाटक, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती जी नारायण (CMD)
राधाकृष्णन दुराईराजन (ED) []
मालक अंतराळ विभाग[]
संकेतस्थळ https://www.nsilindia.co.in/

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ५ जुलै २०१९ रोजी आपल्या बजेट भाषणात न्यूस्पेस इंडियाच्या स्थापनेचा उल्लेख केला होता. []

उद्दीष्टे

संपादन

खालील उद्दीष्टांसह न्यूस्पेस इंडियाची स्थापना केली गेली होती: []

  • लघु उपग्रह तंत्रज्ञानाचे उद्योगात हस्तांतरण: न्यूस्पेस इंडिया अंतराळ विभाग / इस्रोकडून परवाना प्राप्त करेल व उद्योगांना उपपरवाना देईल.
  • खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने लघु उपग्रह प्रक्षेपण वाहन (एस.एस.एल.व्ही.)चे उत्पादन
  • भारतीय उद्योगांद्वारे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पी.एस.एल.व्ही.)चे उत्पादन
  • प्रक्षेपण आणि अनुप्रयोगासह अंतराळ संबंधित उत्पादने आणि सेवांचे उत्पादन आणि विपणन
  • इस्रो केंद्रे आणि अंतराळ विभागाच्या घटकांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण
  • भारत आणि परदेशात अनुषंगिक परिणामी तंत्रज्ञान आणि उत्पादने / सेवांचे विपणन

संदर्भ

संपादन
  1. ^ "New Company for Commercial Exploitation of Research and Development (Under The Company Act 2013)". 27 June 2019. 21 December 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "NSIL functional directors". 15 July 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "NSIL About Us". 21 December 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "ISRO's new commercial arm NewSpace India officially inaugurated". smartinvestisor.business-standard.com. The Smart Investor. 2019-08-27. 2019-08-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-27 रोजी पाहिले.
  5. ^ Narasimhan, T. E. (2019-07-05). "Budget 2019: FM hikes Dept of Space outlay, pushes for commercialisation". Business Standard India. 27 August 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-27 रोजी पाहिले.
  6. ^ "NewSpace India Limited". Press Information Bureau, Government of India. 24 Jul 2019. 26 August 2019 रोजी पाहिले.