नुसरत फतेह अली खान

पाकिस्तानी संगीतकार, प्रामुख्याने कव्वाली गायक (1948-1997)
(नुसरात फतेह आली खान या पानावरून पुनर्निर्देशित)

नुसरत फतेह अली खान (उर्दू:نصرت فتح علی خان;१३ ऑक्टोबर, इ.स. १९४८:फैसलाबाद, पाकिस्तान - १६ ऑगस्ट, इ.स. १९९७) हे प्रसिद्ध सुफी कव्वाल होते. त्यांनी आध्यात्मिक अंग लाभलेल्या कव्वाली या गायकीच्या परंपरेला जागतिक दर्जा मिळवून दिला.[ दुजोरा हवा] त्यांचे घराणे कव्वाल गायकी जिवंत ठेवणारे ६०० वर्षांचे जुने घराणे आहे. नुसरत फतेह अली खान यांना शहेनशाह-ई-कव्वाल या नावाने ओळखले जाते.[]१९९५ साली युनेस्को संगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Ustad-nusrat-fateh-ali-khan-vishal-singh-rana-18911

जागतिक चाहते

संपादन

ल्युसिआनो पावरोत्ती, कीथ जॅरेट, यहुदी मेनूहिन, पीटर गॅब्रिएल, युसुफ एन'डूर, राय कूडर, जेफ बकली आणि एडी व्हेडर यांसारखे जागतिक संगीत तज्ज्ञ त्यांचे चाहते होते. []

जीवन चरित्र

संपादन

नुसरत फतेह अली खान यांचे घराणे पंजाबी मुस्लिम वंशीय आहे. त्यांचे वडील उस्ताद फतह अली खां हे स्वतः अत्यंत उत्तम दर्जाचे कव्वाल होते. नुसरत फतेह अली आपल्या गायकीच्या पेशात येऊ नये, असे वडिलांना वाटत होते, तथापि वडलांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या एका धार्मिक कार्यक्रमात नुसरत फतेह अली यांनी वडिलांना कव्वालीचीच श्रद्धांजली अर्पण करून आपल्या गायन कलेचा प्रारंभ केला. अल्पावधीत त्यांनी प्रसिद्धीचे शिखर गाठले. १९७१ साली ते कूटुंबातील कव्वाल गायन प्रमुख बनले. त्यांचे १२५ अल्बम असून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांच्या या विश्व विक्रमाची नोंद घेतली आहे.

 
नुसरत फतेह अली खान कला भवन फैसलाबाद.

नुसरत फतेह अली खान यांचे पुतणे राहत फतेह अली खान हे देखील कव्वाल गायक आहेत. राहत फतेह अली खान यांनी आपल्या काकाची सुफी गायनाची परंपरा पुढे नेली.

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन