निळ्या छातीचा लावा, गरंज लावा, पेपट लावा, कानेली किंवा लहान टुरी (इंग्लिश: Blue-breasted Quail; हिंदी:चीना बटेर, गोबल बुटई) हा भारतात आढळणारा एक पक्षी आहे.

गरंज लावा

गरंज लावा आकाराने मोठ्या लाव्यापेक्षा लहान असतो. नर उडत असताना इतर कुठल्याही लावा पक्ष्यापेक्षा गडद रंग ठळकपणे दिसतो. मादी:भुवया फिक्कट, पिवळसर तांबूस छाती आणि कुशीवर काळसर पट्टे असतात. स्थायिक संचार करणारा स्थायिक पक्षी आहे. श्रीलंका आणि भारतात मुंबई, तसेच सिमला येथे हा पक्षी आढळतो.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली