निर्माल्य म्हणजे देवीदेवतांना वाहिलेली फुले, हार तसेच बेल, शमी, दुर्वा, रुई इत्यादी पवित्र वनस्पतींचा, शिळे झाल्यामुळे, दुसऱ्या दिवशीच्या पूजेवेळी, त्यागलेला ढिग होय. या निर्माल्याचे तलावात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याची पद्धत आहे. देवीदेवतांना वाहिल्यामुळे त्यास पवित्र समजतात. ते पायदळी तुडवत नाही. मात्र हल्ली हल्ली या निर्माल्याचे विसर्जन न करता याचा उपयोग कंपोस्टींग अर्थात घरगुती खत निर्मितीसाठी केला जातो. कारण हेच खत फूल/फळ झाडांना देऊन फुले/फळे निर्मिती करून अर्पण करता येतात. त्यामुळे निर्माल्याचे नदी/तलावात विसर्जन करण्याऐवजी खत तयार करावे. बऱ्याचदा निर्माल्याचे विसर्जन करताना इतर पर्यावरणास घातक पदार्थ देखिल विसर्जीत होऊ शकतात.