मुख्य मेनू उघडा

निमरूद

इराकमध्ये मोसुल शहराजवळ तिग्रीस नदीच्या तीरावर असलेले एक पुरातत्त्वीय स्थळ.

निमरूद हे सध्या इराकमध्ये असलेले असीरियन संस्कृतीचे एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. मोसुल शहरापासून हे ठिकाण ३० किलोमीटरवर तिग्रीस नदीच्या तीरावर आहे. बायबलमध्ये निमरूदचा उल्लेख कलाह असा केलेला आहे.

निमरूद
निमरूद is located in इराक
निमरूद
निमरूद
निमरूदचे इराकमधील स्थान
गुणक: 36°5′57″N 43°19′39″E / 36.09917°N 43.32750°E / 36.09917; 43.32750

इतिहाससंपादन करा

८९० एकराचा परिसर व्यापलेल्या या नगरीची स्थापना शलमानेसेर या असिरियन राजाने इ.स.पूर्व तेराव्या शतकात केली.[१] अशुरबानीपाल दुसरा याने इ.स.पूर्व नवव्या शतकात या नगरीचे पुनरुज्जीवन केले. या नगरीत अनेक प्रासाद व मंदिरे होती. नगरीभोवती तटबंदी बांधलेली होती. प्रासादांच्या अवशेषात प्रचंड आकाराची पंखयुक्त दगडी बैलांची शिल्पे आहेत.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ मार्क वान डी मयरुप (इ.स. १९९७). "द एन्शन्ट मेसोपोटेमियन सिटी" (इंग्रजी मजकूर). ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस. २९ जून, इ.स. २०१३ रोजी पाहिले.