निढळ
निढळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. गावाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. चंद्रकांत दळवी(भा.प्र.से) हे गावचे सुपुत्र महाराष्ट्राचे सहकार आयुक्त होते. गावाला 'आदर्श गाव' म्हणून संबोधले जाते. गावाला संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात पहिला क्रमांक आला आहे. गावाला अनेक दिग्गजांनी भेटी दिल्या आहेत. अनेक मंत्री व नेत्यांनी गावाला भेटी दिल्या आहेत. गावात जलसंधरणासाठी कामे चालू आहेत. गावात हनुमान टेकडी हे प्रसिद्ध स्थळ आहे. तिथे एक हनुमानाची मूर्ती आहे. त्या टेकडीवरून मनमोहक निसर्गाचे दर्शन होते. गावाच्या बाजूने सातारा पंढरपूर हा महामार्ग जातो.पुढे हा महामार्ग सोलापूर व हैदराबाद ला जातो.[१]
?निढळ महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | खटाव |
जिल्हा | सातारा जिल्हा |
लोकसंख्या | ५,००० (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | सौ.बायडाबाई ठोंबरे |
बोलीभाषा | मराठी, सातारी, माणदेशी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४१५०२३ • एमएच११ |
भौगोलिक स्थान
संपादनसातारा या जिल्ह्याच्या ठिकाणापासून पूर्वेकडे ४९ किमी अंतर आहे.खटाव गावापासून १० किमी व पुसेगाव पासून ७ किमी अंतर आहे.
हवामान
संपादनयेथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननिढळ गार्डन
निळकंठेश्र्वर मंदिर
गणपती मंदिर
लक्ष्मी मंदिर
विठ्ठल मंदिर
मारुती मंदिर
जलसंधारण कामे
नागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादन.पुसेगाव
.कतळगेवाडी
.उंबरमले
पुसेगाव
पांढरवाडी
गोडसे वाडी
दरजाई
कुळकजाई
सत्रेवाडी
मलवडी
शिंदेवाडी
संदर्भ
संपादन- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
- ^ "गावांच्या विकासाचे पथदर्शी 'निढळ' मॉडेल". दिव्य मराठी. २३ जुलै २०१८ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.