निंगबो
चीनमधील एक शहर
निंगबो (चिनी: 宁波市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील च-च्यांग या प्रांतातले एक मोठे शहर व बंदर आहे. निंगबो शहर चीनच्या पूर्व भागात शांघायच्या २२० किमी दक्षिणेस तर हांगचौच्या १५० किमी आग्नेयेस पूर्व चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०२० साली निंगबो महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ९४ लाख होती.
निंगबो 宁波市 |
|
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
देश | चीन |
प्रांत | च-च्यांग |
क्षेत्रफळ | ९,८१६ चौ. किमी (३,७९० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४८८ फूट (१४९ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ४४,७९,६३५ |
- घनता | ९६० /चौ. किमी (२,५०० /चौ. मैल) |
- महानगर | ९४,०४,२८३ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० |
http://www.ningbo.gov.cn/ |
निंगबो चीनमधील १६ उप-प्रांतीय दर्जाच्या शहरांपैकी एक असून ते ह्या देशातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे. २०१८ साली येथील आर्थिक उलाढाल १९,१६८ कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी होती. येथील बंदर जगातील सर्वात वर्दळीचे बंदर आहे. हांगचौ-षेंचेन द्रुतगती रेल्वेमार्ग निंगबोमधूनच धावतो. येथाल ३५ किमी लांबीचा हागंचौ खाडी पूल हा समुद्रावर बांधण्यात आलेला जगातील सर्वाधिक लांबीच्या पूलांपैकी एक आहे.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिव्हॉयेज वरील निंगबो पर्यटन गाईड (इंग्रजी)
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)