नारायणगड हे महाराष्ट्रातील पौंडुळ गाव, शिरूर तालुका, बीड जिल्हा येथे असलेले विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराची स्थापना नारायणबाबा यांनी केले आहे. भाविकांमध्ये हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे.

अवडंबरच्या घराण्यात नारायण नामक मुलाचा जन्म झाला. नारायणाने गावाजवळील डोंगरमाथ्यावर जागा स्वच्छ करून हरिनामात दंग झाले. नंतर त्यांना नगद नारायणबाबा हे नाव पडले. त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. त्या ठिकाणी छोटेसे देऊळ बांधले. विठ्ठलाची मूर्ती स्थापन केली. याठिकाणी श्रीक्षेत्र नारायणगड उभा राहिला. व श्री क्षेत्र नारायणगड हे धाकटी पंढरी म्हणुन देखील ओळखले जाते.

श्री नारायणगडाची गुरुपरंपरा पुढीलप्रमाणे आहे.

आदीनारायण - विधी - अत्रि - दत्तात्रय - जनार्दन - एकनाथ - गावबा- अनंत- दयानंदस्वामी पैठणकर - आनंदऋषी - नगदनारायण - महादेव (पहिले) - शेटीबाबा(दादासाहेब महाराज) - गोविंद महाराज - नरसु - महादेव (दुसरे) - माणिकबाबा - भगवानबाबा -महादेवबाबा - शिवाजी महाराज (विद्यमान प्रमुख)

नगदनारायण महाराज हे संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील महान असे सत्पुरुष होते.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "श्रीक्षेत्र भगवानगड". ३० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)