नायब सुभेदार बाना सिंग

नायब सुभेदार बाना सिंग (६ जानेवारी, १९४९:कड्याल, जम्मू आणि काश्मीर, भारत - हे भारतीय भूसेनेतील सैनिक आहेत. त्यांना परमवीरचक्र हा सर्वोच्च लष्करी सन्मान दिला गेला.

त्यांचा जन्म शेतकरी शीख कुटुंबात पंजाबच्या कड्याल या खेड्यात झाला. पाच भाऊ आणि तीन बहिणींमध्ये ते जेष्ठ होते. या मोठ्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी बहुतेक सर्वजण शेतीची कामे करीत. सुभेदार बाना सिंग यांचे आई-वडील अत्यंत धर्मशील होते. बाना सिंगांचे आठवीपर्यंतचे शिक्षण जन्मगावी झाले आणि पुढील मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण त्यांनी शेजारच्या बड्याळ ब्रह्य या गावी घेतले. ते वयाच्या विसाव्या वर्षी ६ जानेवारी १९६९ रोजी भारतीय भूसेनेत भरती झाले. सुभेदार पद मिळाल्यावर त्यांच्याकडे एका स्वतंत्र पलटणीचे नेतृत्व आले.

नायब सुभेदार बाना सिंग यांनी केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना १९८८मध्ये परमवीरचक्र पदक देऊन गौरविले गेले. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना ते म्हणाले, माझ्या बटालियनच्या कुणाही व्यक्तीने जे केले असते तेच मी केले; आणि माझ्या सुदैवाने मी त्यांचे नेतृत्व केले. निवृत्तीनंतर ते आपल्या गावी पुढील जीवन शेती व्यवसायात व्यतीत करीत आहेत.