नाटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?नाटे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर राजापूर
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२३५३
• एमएच/08०८

भौगोलिक स्थान

संपादन

नाटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. राजापूर तालुक्याच्या ठिकाणापासून २९. ८ किमी व रत्‍नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणापासून ५०.७ किमी अंतरावर आहे.

हवामान

संपादन

इतर कोकण प्रमाणे पावसाळ्यात भरपूर पाऊस आणि थंडीत खूप थंडी असते. उन्हाळ्यात उष्ण व कोरडे हवामान असते.

लोकजीवन

संपादन

नाटे गावात ८० टक्के हिंदू, १० टक्के मुस्लिम व १० टक्के बौद्ध धर्मीय लोक आहेत. "गणेश उत्सव" व "होळी उत्सव" या सणांस मुंबई, पुणे येथे कामानिमित्त स्थायिक झालेले चाकरमनी आपल्या गावी येतात.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

1) यशवंतगड किल्ला- नाटे गावानजीक "यशवंतगड" नावाचा किनारी दुर्ग आहे. "मुसाकाजी" या प्राचीन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी यशवंतगड बांधण्यात आला. यशवंतगड हा उंचवट्यावर पठारावर वसवलेला किल्ला आहे. नाटे गावातून आंबोळगडच्या दिशेने जाताना हा जवळच किल्ला लागतो.

2) मुसाकाजी बंदर- यशवंतगड किल्ल्याच्या पुढे डावीकडे एक फाटा मुसाकाजी बंदराला जातो. पूर्वी हे "मुंबई ते गोवा" समुद्री प्रवासी वाहतुकीचे एक मुख्य बंदर होते. सध्या हे फक्त मासेमारी पुरता मर्यादित आहे.

3) श्री. नवलादेवी मंदिर- नाटे गावात मुख्य बाजारपेठे पासून साधारण २ किमी. अंतरावर प्रसिद्ध "श्री. नवलादेवी मंदिर" आहे. या मंदिरात श्री नवलादेवी, श्री निनादेवी, श्री देव रवळनाथ यांच्या मुर्त्या आहेत. शिमग्याच्या वेळी देवीचे खेळे गावागावात फिरून घरोघरी खेळे नाचवून होळीच्या दिवशी मंदिरासमोर गावातील खोतांच्या उपस्थितीत होळी बनवली जाते. व नंतर त्याभोवती फेर धरले जातात. मे महिन्याच्या मध्यात देवीला कौल लावून पालखीचा दिवस ठरवला जातो. पालखीला वाडीवाडीतून नाचवत शेजारील आंबोळगड गावातील "गोडिवणे" येथे देवीच्या माहेरी नेली जाते. नंतर ती पुन्हा देवळात नेली जाते. नवरात्रीच्या कालखंडात नऊ दिवस मंदिरात जागरण, भजने, इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात. गावागावातील लोक या सोहळ्यात उपस्थित राहून आनंद घेतात.

4) श्री. नाटेश्वर मंदिर- नाटे गावापासून धारतळेच्या दिशेने जाताना "श्री नाटेश्वर मंदिर" फाटा लागतो. त्या फाट्यातून आत साधारण १.५० किमी अंतरावर शंकराचे जागृत "श्री. नाटेश्वर मंदिर" आहे. याच देवतेच्या नावावरून गावास "नाटे" हे नाव पडले.

5) श्री. विठलादेवी मंदिर- नाटे गावातून आंबोळगडच्या दिशेने जाताना साधारण ४ किमी अंतरावर नाटे गावातीलच एक वाडी "पडवणे वाडी"च्या दक्षिण दिशेला समुद्राला लागून "श्री. विठलादेवी मंदिर" आहे. मंदिर जास्त पुरातन नाही. श्री. विठलादेवी ही श्री. नवलादेवीची बहीण आहे, अशी मान्यता आहे. मंदिर शेजारी विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. शेजारीच एक पर्या (व्हाळ) आहे. हा व्हाळ जवळील "पांगले वाडी" येथून उगम पावून समुद्राला येऊन मिळतो.

6) श्री. मठेश्वर मंदिर-  पडवणे वाडीतच श्री. मठेश्वर मंदिर आहे. शेजारीच एक नैसर्गिक पर्या (व्हाळ) आहे. पावसाळ्यात हा व्हाळ पूर्णपणे भरून ओसंडून वाहतो. या व्हाळातील निर्माण झालेला मनमोहक धबधबा पाहण्याजोगा असतो.

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

1) आंबोळगड गाव- ४ किमी

2) जैतापूर गाव- ३ किमी

3) तालुका: राजापूर - ३० किमी

4) जिल्हा: रत्‍नागिरी - ५०.७ किमी

संदर्भ

संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/