नागपूर ब्रॉड गेज मेट्रो

नागपूर शहरातील प्रस्तावित जलद परिवहन व्यवस्था

नागपूर ब्रॉड गेज मेट्रो हा महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील नागपूर शहरातल्या प्रवाशांसाठी एक नियोजित रेल्वे प्रकल्प आहे. या प्रकल्पाची व्याप्ती नागपूर आणि समीपच्या वर्धा आणि भंडारा मध्ये सुद्धा आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड राबवित आहे.

सविस्तर प्रकल्प अहवाल

संपादन

या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा डीपीआर) अर्बन मास ट्रान्सीट कंपनी (यूएमटीसी) ने तयार केला होता. या अहवालानुसार जवळपास २७० किमीच्या ४ मार्गिका निर्मित करण्यात येतील. या मार्गिकेची एकूण किंमत ₹४१८ करोड असेल. ३ डब्ब्यांच्या गाड्या भारतीय रेल्वेच्या ब्रॉड गेज रुळांवर ताशी १६० किमीच्या कमाल वेगाने धावतील.[] प्रत्येक गाडीची क्षमता ८८५ पप्रवाश्यांची असेल. ऑगस्ट २०१९ मध्ये यूएमटीसी ने निर्णायक डीपीआर सादर केला होता. २०२१ मध्ये या मेट्रोच्या विविध मार्गांवरून अपेक्षित प्रवासीसंख्या या प्रमाणे आहे : वर्धा ५६६९, नरखेड २६१६, रामटेक ३९२९ आणि भंडारा रोड२५५६. एकूण प्रवासीसंख्या १४,७०० इतकी अपेक्षित आहे. गाड्यांची कमाल रचनात्मक गती ताशी २०० किमी असेल आणि व्यवहार्य कमाल गती ताशी १६० किमी असेल.[] मार्च २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाने ब्रॉडगेज मेट्रोच्या प्रस्तावाला मंजूरी दिली .[] रेल्वे बोर्ड, भारत सरकारच्या अंतर्गत रेल्वे मंत्रालयाने नोव्हेंबर २०१९ मध्ये डीपीआरला मान्यता दिली आहे[]

मार्ग

संपादन

यूएमटीसीने त्यांच्या आवाहालामध्य 4 मार्ग प्रस्तावित केले आहेत

खापरी, नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी येथे नागपूर मेट्रोच्या फेज १ सह अदलाबाद स्थानकांचा निर्माण केल्या जाईल.[]

५ किमी पर्यंतच्या अंतरासाठी किमान भाडे ₹२० असेल तर तेच 70 किमीच्या वरच्या अंतराचे भाडे ₹९० असेल असेल. मासिक पासचे भाडे ₹४०० ते ₹१८०० पर्यंत असेल .[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "संग्रहित प्रत". 2020-02-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-17 रोजी पाहिले.
  2. ^ News, Urban Transport. "संग्रहित प्रत". 2020-02-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-17 रोजी पाहिले.
  3. ^ Mar 8, Ashish Roy | TNN | Updated:; 2019; Ist, 12:02. https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/state-clears-rs330-crore-broad-gauge-metro-plan/articleshow/68310111.cms. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ Khare, Anushka. "संग्रहित प्रत". 2020-02-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-17 रोजी पाहिले.
  5. ^ a b Nov 28, Ashish Roy | TNN | Updated:; 2019; Ist, 14:09. https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/railway-board-gives-nod-to-broad-gauge-metro-dpr/articleshow/72267308.cms. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)