नाइकी किंवा नाइके ही ग्रीक पौराणिक कथांनुसार विजयाची देवता मानली जाते. ती स्टीक्स्पॅल्लास यांची कन्या आहे.

नाइकी ही साधारणतः खेळाशी जोडली जाते. नाइके या क्रीडा-सामग्री बनवणाऱ्या कंपनीचे नाव हिच्या नावावरून ठेवले आहे. ग्रीष्मकालीन ऑलिंपिक सामन्यांच्या पदकांवर हिचे चित्र अंकित असते. हिचे रोमन नाव व्हिक्टोरिया आहे.