नंदिनी रमानी
नंदिनी रमानी (१८ नोव्हेंबर, १९५०: चेन्नई, तमिळनाडू, भारत ) या एक अनुभवी भरतनाट्यम नृत्यांगना, शिक्षिका, समीक्षक आणि संस्कृत नाटकांच्या दिग्दर्शक आहेत.[१] नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती रमानी यांना २०१२ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[२]
नंदिनी रमानी | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | १८ नोव्हेंबर, १९५० |
जन्म स्थान | चेन्नई, तमिळनाडू, भारत |
व्यक्तिगत माहिती | |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
गौरव | |
पुरस्कार | संगीत नाटक अकादमी पुरस्कार |
ओळख
संपादन१८ नोव्हेंबर १९५० रोजी जन्मलेल्या श्रीमती नंदिनीने वयाच्या सहाव्या वर्षी भरतनाट्यम नृत्य शिकण्यास सुरुवात केली. गणेशन नट्टूवनार यांच्याकडून नृत्य शिकून आणि तिचे गुरू टी. बालसरस्वती कडून अभिनय (२५ वर्षांहून अधिक काळ).[३] तिच्या वडिलांचे नाव डॉ. व्ही. राघवन आणि भरतनाट्यम नृत्यांगना आणि शिक्षिका प्रियमवदा शंकर यांची धाकटी बहीण आहे.[४]
कारकीर्द
संपादनश्रीमती नंदिनी यानी १९७० मध्ये अरंगेत्रम भारत आणि परदेशात सादर केली. १९७३-७८ दरम्यान तिने मद्रास म्युझिक अकादमीद्वारे आयोजित भरतनाट्यमच्या बालासरस्वती स्कूलमध्ये शिकवले, जिथे तिने नृत्य प्रशिक्षण सुरू केले.[५]
पुरस्कार
संपादनत्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तमिळनाडू राज्याच सर्वोच्च नागरिक कलईमामणि पुरस्कार त्यांना मिळाले आहे.[६] श्रीमती रमानी यांना नृत्यात दिलेल्या योगदानाबदल २०१२ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[७]
संदर्भ
संपादन- ^ "Nandini Ramani as the torchbearer of Bala bani". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 8 February 2018. 4 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Sangeet Natak Akademi fellowships (Akademi Ratna) and Akademi Awards (Akademi Puraskar) for the Year 2012 Announced". pib.gov.in (इंग्रजी भाषेत). 24 December 2012. 4 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Carrying a legacy". डेक्कन हेराल्ड (इंग्रजी भाषेत). 23 July 2016. 4 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Tradition and talent in balance". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 27 December 2019. 4 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Bala, queen of abhinaya - Dhvani Ohio" (PDF). dhavaniohio.org (इंग्रजी भाषेत). 4 May 2023. 4 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 4 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Tamil Nadu Kalaimamani awards – full list of winners". Indianexpress.com (इंग्रजी भाषेत). 15 August 2019. 4 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Ilayaraja gets Sangeet Natak Akademi award". thehindubusinessline.com (इंग्रजी भाषेत). 12 March 2018. 4 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2023 रोजी पाहिले.