धौलगिरी

(धौलागिरी या पानावरून पुनर्निर्देशित)

धवलगिरी (उंची ८,१६७ मीटर) हे हिमालय पर्वतरांगेतील एक उंच शिखर आहे. इ.स. १९६० साली स्विस, ऑस्ट्रियन व नेपाळच्या संयुक्त मोहिमेने हे ‘माउंट धौलागिरी’ अथवा ‘माउंट धवलगिरी’ शिखर सर केले. टीममध्ये के. दिम्बर्गर, ए.शेल्बर्ट व नवांग दोरजे यांचा समावेश होता. या मोहिमेच्या वेळी इतिहासामध्ये सर्व प्रथमच काही गिर्यारोहणासाठीचे साहित्य हलक्या विमानांच्या साहाय्याने एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहचविण्यात आले.