धाविक (पक्षी)

पक्ष्यांच्या प्रजाती

धाविक पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठीमध्ये धाविक / गेडरा म्हणतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते. हा पक्षी जमिनीवर धावत असतो, म्हणून त्याला 'धाविक' हे नाव मिळाले.धाविक पक्षी समूहाने आढळतात.

धाविक

हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तिराएवढा असतो.त्याचा रंग वाळूसारखा असतो व दिसायला टिटवीसारखा असतो.त्याचा खालून तांबूस व काळा रंग असतो.गडद तांबूस डोके असून,डोळ्यांतून काळी-पांढरी पट्टी असते.त्याचे पाय लांब पांढुरकेअसतात.नर-मादी दिसायला सारखे असतात.


वितरण

संपादन

आसाम सोडून सर्व भारतभर आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे. महाराष्ट्रात मयुरेश्वर अभयारण्य येथे आढळतो. मार्च ते ऑगस्ट या काळात वीण.

निवासस्थाने

संपादन

माळराने व खडकाळ टापू.

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन

पक्षीकोश

लेखक:

मारुती चितमपल्ली