ढाक हे पश्चिम बंगालमधील एक चर्मवाद्य आहे. हे वाद्य विविध आकारात आढळते. ढाक दोन लाकडी काठ्यांच्या सहाय्याने गळ्यात अडकवून किंवा कमरेला अडकवून वाजवले जाते. त्याच्या डाव्या बाजूला भारदस्त आवाजासाठी थर चढवला जातो. पश्चिम बंगालमधील दुर्गापूजेमध्ये ढाक वाद्य वाजवले जाते.