द फर्म (कादंबरी)

जॉन ग्रिशमची १९९१ ची कादंबरी

’’’एक माफिया फॅमिलीः’’’ सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमधून जमवलेला प्रचंड काळा पैसा पांढरा करणारी...
त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारी...

’’’एका वकिलाची फर्म’’’ माफिया फॅमिलीचा सभ्य धुवट चेहरा असलेली...
फॅमिलीच्या काळ्या पैशाचं बेमालूमपणे 'शुद्धीकरण' करणारी...

’’’एक वकिल’’’
नुकताच शिक्षण घेऊन बाहेर पडलेला अत्यंत हुशार, चलाख तरुण पोरगा...
फर्ममध्ये नोकरी मिळाल्यावर त्याला आणि त्याच्या सुंदर बायकोला वाटतं,
आता फक्त सुंदर भविष्यकाळ, भरपूर पैसा, बीएमडब्ल्यू...

प्रत्यक्षात मात्र दोघंही फर्मच्या सोनेरी जाळ्यात अडकतात...
आणि एकीकडे माफिया फॅमिली, तर दुसरीकडे एफबीआय, अशा कात्रीत सापडतात...
आणि जीव वाचवत पळत सुटतात... कायमचे.

द फर्म
लेखक जॉन ग्रिशॅम
अनुवादक अनिल काळे
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रथमावृत्ती जून २०१०
मुखपृष्ठकार चंद्रमोहन कुलकर्णी
विषय कादंबरी
पृष्ठसंख्या ४८०
आय.एस.बी.एन. ९७८-८१-८४९८-१०६-३