द केरळ स्टोरी

२०२३ मधील भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट
(द केरला स्टोरी या पानावरून पुनर्निर्देशित)
দ্য কেরালা স্টোরি (bn); ધ કેરલા સ્ટોરી (gu); The Kerala Story (ca); द केरल स्टोरी (mr); داستان کرالا (fa); ケララ物語 (ja); The Kerala Story (id); دی کیرالہ اسٹوری (ur); ദി കേരള സ്റ്റോറി (ml); The Kerala Story (nl); The Kerala Story (en); द केरल स्टोरी (hi); ದ ಕೇರಳ ಸ್ಟೋರಿ (kn); The Kerala Story (fi); দ্য কেৰেলা ষ্ট’ৰী (as); قصة كيرالا (ar); ది కేరళ స్టోరీ (te); தி கேரளா ஸ்டோரி (ta) ২০২৩-এর সুদীপ্ত সেন পরিচালিত চলচ্চিত্র (bn); film de Sudipto Sen, sorti en 2023 (fr); ૨૦૨૩નું ભારતીય-હિંદી ચલચિત્ર (gu); Film berbahasa Hindi India 2022 (id); 2023 Indian Hindi-language film directed by Sudipto Sen (en); 2023-ലെ ഇന്ത്യൻ സിനിമ (ml); Indiase film van Sudipto Sen uit 2023 (nl); २०२३ मधील भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट (mr); 2023 भारतीय हिंदी भाषा फिल्म (hi); ೨೦೨೩ರಲ್ಲಿ ಸುದೀಪ್ತೊ ಸೇನ್ ನಿರ್ದೇಶನದಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆಗೊಂಡ ಭಾರತೀಯ ಚಲನಚಿತ್ರ (kn); ୨୦୨୩ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); সুদীপ্ত সেনৰ দ্বাৰা পৰিচালিত ২০২৩ চনৰ ভাৰতীয় হিন্দী ছবি (as); スディプト・センによる2023年の映画 (ja); 2022 భారతీయ సినిమా (te); ᱒᱐᱒᱓ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat)

द केरळ स्टोरी हा २०२३ मधील सुदिप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित हिंदी भाषेतील चित्रपट आहे.[] या चित्रपटाची कथा ही केरळमधील महिलांच्या अशा एका गटाची कथा आहे ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) मध्ये त्या सामील झाल्या. केरळमधील हजारो महिलांचे इस्लाममध्ये धर्मांतर करून ISIS मध्ये भरती केल्याचा दावा केल्यामुळे हा चित्रपट विवादास्पद ठरला आहे.[][]

द केरल स्टोरी 
२०२३ मधील भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
मूळ देश
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • मे ५, इ.स. २०२३
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

काँग्रेस पक्षाने लव्ह जिहाद ही काल्पनिक गोष्ट आहे आणि हा चित्रपट संघ परिवाराच्या अजेंडाचा प्रचार आहे अशी टीका केली आहे.[]

या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी, सिद्धी इदनानी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित झाला असून यावर चित्रपट समीक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे.[]

कथानक

संपादन

फातिमा बा ही एक इस्लाम धर्म स्वीकारलेली स्त्री असून, तिला रुग्णालयातील परिचारिका बनवायचे होते. एक दिवस काही अतिरेक्यांनी तिचे अपहरण करून जबरदस्तीने तिला ISIS मध्ये सामील केले. पर्यायाने तिला अफगाणिस्तानात तुरुंगात टाकण्यात आले.

पात्र

संपादन
  • शालिनी उन्नीकृष्णन / फातिमा बा च्या भूमिकेत अदा शर्मा
  • निमळ म्हणून योगिता बिहाणी
  • आसिफाच्या भूमिकेत सोनिया बालानी
  • गीतांजलीच्या भूमिकेत सिद्धी इदनानी
  • शालिनीच्या आईच्या भूमिकेत देवदर्शनी
  • विजय कृष्ण
  • प्रणय पचौरी
  • प्रणव मिश्रा[]

विरोधक

संपादन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) या पक्षांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला आहे आणि आरोप केला आहे की हा चित्रपट चुकीची माहिती प्रसारित करतो आणि संघ परिवाराच्या अजेंड्याला प्रोत्साहन देतो. या पक्षांच्या मते लव्ह जिहाद ही काल्पनिक कथा आहे.[][][] या आरोपांना उत्तर देताना, निर्माता, शाह यांनी सांगितले की "आम्ही जे काही बोलतो ते पुराव्यानिशीच आहे" त्यांच्या मते सेन यांनी यांनी या चित्रपटासाठी चार वर्षे सखोल संशोधन केले आहे.[१०]

केरळच्या विरोधात खोटा प्रचार केला जात आहे आणि जातीय सलोखा नष्ट केला जात आहे, अशी तक्रार तामिळनाडूस्थित एका पत्रकाराने केरळच्या मुख्यमंत्र्यांकडे केली. या नंतर केरळ राज्याचे पोलीस प्रमुख अनिल कांत यांनी यावर तिरुवनंतपुरम शहर पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले.[११][१२] १५ नोव्हेंबर २०२२ रोजी कायदेशीर सल्लागाराच्या सल्ल्यानुसार यावर एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही.[१३] तथापि या, चित्रपटाची चौकशी मात्र केल्या गेली.[]

या चित्रपटाच्या प्रदर्शनास, केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाच्या मते या चित्रपटात केलेले आरोप हे ISIS बद्दल आहेत आणि कोणत्याही विशिष्ट धर्माच्या दिशेने निर्देशित केलेले नाहीत. यापूर्वी सुप्रीम कोर्ट आणि मद्रास हायकोर्टानेही असेच अर्ज फेटाळले होते.[१४] मात्र इस्लामिक स्टेट्स द्वारे ३२,००० मुलींची भरती केल्याचा वादग्रस्त दावा करणारा टीझर काढून टाकण्यास निर्मात्यांनी सहमती दर्शवली.[१५][१४]

९ मे २०२३ रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची घोषणा केली आणि राज्यातील चित्रपटगृहांना चित्रपट प्रदर्शित करण्यापासून रोखले. बॅनर्जी यांनी नंतर सांगितले की, राज्यात शांतता राखण्यासाठी आणि हिंसाचार किंवा द्वेषपूर्ण गुन्हेगारीच्या कोणत्याही घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर या चित्रपटाची टीम आवश्यक कायदेशीर कारवाई करेल असे चित्रपट निर्मात्याने म्हणले.[१६][१७]

९ मे २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक धक्कादायक विधान केले होते. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक रित्या फाशी देण्यात यावी, असे जाहीर केले.[१८][१९] यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांना ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.[२०]

बॉक्स ऑफिस

संपादन

पहिल्या दिवशी, चित्रपटाने भारतात ₹८.०३ कोटींची कमाई केली,[२१] २०२३ साठीच हा चित्रपट भारतातील पाचव्या सर्वोच्च ओपनर बनला.[२२]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "'The Kerala Story', starring Adah Sharma, gets release date". The Hindu (इंग्रजी भाषेत). PTI. 2023-04-24. ISSN 0971-751X. 26 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-04-26 रोजी पाहिले.
  2. ^ "'32000 Kerala women in ISIS': Misquotes, flawed math, imaginary figures behind filmmaker's claim". Alt News (इंग्रजी भाषेत). 2022-11-08. 3 December 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 December 2022 रोजी पाहिले.
  3. ^ a b Ellis-Petersen, Hannah (2022-11-09). "Indian police investigating film that portrays Kerala as Islamic terrorism hub". The Guardian (इंग्रजी भाषेत). ISSN 0261-3077. 2 December 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-04-26 रोजी पाहिले.
  4. ^ "Congress urges state not to give screening permission for film 'The Kerala Story'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-04-28. 29 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-04-29 रोजी पाहिले.
  5. ^ Nishad, Sneha Singh (26 April 2023). "'The Kerala Story' trailer out: Adah Sharma headlines a hard-hitting, thought-provoking story". Mid-Day. 26 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 April 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "The Kerala Story release date, OTT, trailer, director, cast, plot - all you may want to know". The Economic Times. 5 May 2023. 5 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 May 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "The Kerala Story: Film on India women in Islamic State sparks row". BBC News. 10 November 2022. 10 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.
  8. ^ "'The Kerala Story' in the dock". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2022-11-09. 10 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.
  9. ^ "Cong, DYFI, IUML youth wing demand ban on screening of 'The Kerala Story'". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2023-04-28. 29 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-04-29 रोजी पाहिले.
  10. ^ "Vipul Shah on The Kerala Story criticism: 'We are making a film on a big tragedy, nothing will be without evidence'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-12-26. 26 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-04-26 रोजी पाहिले.
  11. ^ "State Police Chief orders FIR on complaint against The Kerala Story". The Hindu (इंग्रजी भाषेत). Press Trust of India. 2022-11-09. ISSN 0971-751X. 26 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-04-26 रोजी पाहिले.
  12. ^ "കേരളത്തിനെതിരേ വിദ്വേഷ പ്രചരണം; 'ദ കേരള സ്റ്റോറി' ട്രെയ്‌ലറിനെതിരേ വ്യാപക പ്രതിഷേധം". Mathrubhumi (मल्याळम भाषेत). 28 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-04-28 रोजी पाहिले.
  13. ^ Athimuthu, Soundarya (2022-11-09). "'The Kerala Story' Teaser Row: DGP Ordered To Register FIR; Congress Seeks Ban". TheQuint (इंग्रजी भाषेत). 26 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-04-29 रोजी पाहिले.
  14. ^ a b ""There are umpteen movies depicting Hindu sanyasis as rapists": Kerala High Court refuses to stay release of The Kerala Story".
  15. ^ "The Kerala Story producer agrees to remove '32,000 women converted' from teaser". India Today (इंग्रजी भाषेत). 5 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-05-05 रोजी पाहिले.
  16. ^ "West Bengal bans The Kerala Story to 'maintain peace'". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-05-08 रोजी पाहिले.
  17. ^ "Mamata Banerjee announces ban on The Kerala Story in West Bengal, film producer reacts". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-05-08. 2023-05-08 रोजी पाहिले.
  18. ^ "'The Kerala Story producer should be hanged in public': NCP MLA Jitendra Awhad". Hindustan Times (इंग्रजी भाषेत).
  19. ^ "Hang producer of 'The Kerala Story' in public: NCP leader Jitendra Awhad" (इंग्रजी भाषेत). Deccan Herald.
  20. ^ "Sharad Pawar's NCP's Leader Arrested For Stopping Marathi Film's Screening" (इंग्रजी भाषेत). NDTV.
  21. ^ "Guardians of the Galaxy Vol. 3 Box Office: Survives steep competition from Bollywood's The Kerala Story on Day 1". Bollywood Hungama. 6 May 2023. 6 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 May 2023 रोजी पाहिले.
  22. ^ Entertainment Desk (6 May 2023). "The Kerala Story box office collection Day 1: Sudipto Sen's film gets better opening than Selfiee, Shehzada, Kashmir Files; earns Rs 8.03 cr". The Indian Express. 6 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 May 2023 रोजी पाहिले.