दुसरी बौद्ध संगीती
दुसरी बौद्ध परिषद
(द्वितीय बौद्ध संगीती या पानावरून पुनर्निर्देशित)
दुसरी बौद्ध संगीती म्हणजेच द्वितीय बौद्ध परिषदेचे आयोजन वैशाली येथे बुद्धांच्या महापरिनिवाणानंतर सत्तर वर्षांने आयोजन इ.स. ३३४/इ.स. ३८७ साली झाले होते. शिस्त व आचारधर्म याविषयी भिक्खुसंघात मतभेद निर्माण होऊन या संगतीत भिक्खु संघामध्ये विभाजन झाले. वैशालीच्या भिक्खूंचे वर्तन विनय पिटकाच्या विरुद्ध होते त्यामुळे या वैशालीच्या भिक्खूंचा निषेद करण्यात आला. त्यांना आपले वर्तन सिद्धान्त सुधारण्यास व क्षमा मागण्यात सांगण्यात आले. पण वैशालीच्या भिक्खूंनी त्यास नकार दिला. परिणामी बौद्ध संघात फूट पडली, ज्यात सुधारणावादी संघ ज्यास "स्थवीर" तर दुसरा पारंपारिक गट ज्याला "महासंधिक" असे नावे पडली.