देवीगढ

(देवीगढ पॅलेस हॉटेल या पानावरून पुनर्निर्देशित)

देवीगढ पॅलेस हे वारसाहक्काने पुढे चालत असलेले हॉटेल आणि रिसॉर्ट आहे. सध्या ब्युटिक हॉटेल्स इंडिया प्रायव्हेट ली. यांची मालकी आहे. हे १८ व्या शतकात डेलवरा या गावात चालू झाले. मुलाचे देवीगढ पॅलेस १८ ते २० व्या शकापर्यंत डेलवरच्या उच्च कुलीन कुटुंबाचे राहाण्याचे ठिकाण होते. हे ठिकाण राजस्थानमधील अरवली पर्वतरांगेमध्ये उदयपूरच्या २८ किमी ईशान्येस स्थित आहे. या ठिकाणी उदयपूरकडून जाण्यासाठी तीन मार्ग आहेत.

सन २००६ मध्ये या हॉटेलला न्यू यॉर्क टाइम्स ने भारताचे “लिडिंग लक्झरी हॉटेल” हे नामकरण केले होते. आणि त्याचेबद्दल पुनरुच्चार करताना उपखंडातील “बेस्ट हॉटेल” असे वर्णन करून देवीगढ हे अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे असे म्हणले होते.[] या हॉटेल मध्ये ३९ सूट आहेत आणि एक रेस्टारंट आहे.

इतिहास

संपादन

डेलवरा हे शहर “The Town of God” म्हणून ओळखले जायचे. त्याला कारण म्हणजे या ठिकाणी साधारण १००० मंदिरे होती त्यापैकि ४०० जैन मंदिरे होती. हे सुरुवातीला मेवाड राजघराण्याचे अधिपत्याखाली होते. या घराण्याचे राज्य सत्तेचे पुढील काळात १६ विभाग झाले त्याला राजवाडा किंवा जिल्हा म्हणून ओळखू लागले. त्यापैकी डेलवरा हे एक आहे. झाला राजपूत हे बडी सादरी आणि गोगुंडा बरोबरच डेलवरा येथे राज्य करू लागले. पुढील काळात सज्जा सिंह, महाराणा सांगा, यांनी याचा ताबा घेतला. त्यावेळी आवश्यकेनुसार त्यांनी राजवाड्यात सुखसोयी नुसार बदल घडविले.[]

दोन शतकानंतर हे २० वर्षे दुर्लक्षित झाले होते. १९८४ मध्ये शेखावती प्रदेशातील पोद्दार या रईस व्यावसायिक कुटुंबाने हा पॅलेस ताब्यात घेतला. तेव्हा त्यांनी ७५० कामगार आणि गौतम भाटीया आणि नवीन गुप्ता या वास्तुविशारदांच्या मदतीने १५ वर्षे काम करून त्याचे पुनर्रज्जीवण केले. राजवाड्यातील आतील सजावट मुंबईतील राजीव सैनी या इंटेरियर डिझायनर कडून आधुनिक पद्दतीने करून घेतली. या राजवाड्याचे एका सुंदर अशा आरामदाई सूट असणाऱ्या हॉटेल मध्ये रूपांतर केले. त्यात स्पा, आयुर्वेदिक उपचार यांची ही व्यवस्था केली. आता या हॉटेलची गणना भारतातील उत्तम अशा दिमाखदार हॉटेल मध्ये केली जाते.[]

वाहन व्यवस्था

संपादन

हे हॉटेल उदयपूर आणि नाथद्वारा या धार्मिक ठिकाणापासून उत्तर पूर्व बाजूस २८ किमी अंतरावर आहे. देवीगढसाठी वाहानाचा प्रवास साधारण ४५ मिनीटाचा आहे.

पर्यटक आणि घटना

संपादन

सन २००४ मध्ये लिझ हर्ली ही ब्रिटिश मॉडेल आणि चित्रपट नायिका व अरुण नायर हा तिचा NRI मित्र यांनी अरुणचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुक्काम केला होता. त्यानंतर अभिताब बच्चन, सैफ अली खान, फरदिन खान आणि अंबानी बंधूंनीही या हॉटेलला भेट दिली आहे.[]

सन २००७ मध्ये येथे “एकलव्य” या हिंदी सिनेमाचे शूटिंग द रॉयल गार्ड (The Royal Guard) येथे सेट उभारून झालेले आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "डिस्कवरी चॅनेल २१ ऑगस्ट पासून "ड्रीम हॉटेल्स" ही जागतिक हॉटेल्स मालिका सुरू करणार आहे".
  2. ^ "देवीगढ पॅलेस हॉटेल एक शानदार हेरिटेज हॉटेल".
  3. ^ "रास देवीगड पॅलेस उदयपूरच्या बद्दल".
  4. ^ "राजपुताना रॉयल्टी".
  5. ^ "एकलव्य सिनेमा अमिताभ बच्चन यांच्या मालकीचे".