देवमासा
सीटॅसिया या वर्गातील सर्व जलचर सस्तन प्राण्यांना देवमासा म्हणतात. सीटॅसिया वर्गातील सर्वांना जरी देवमासा म्हणतात, तरी बऱ्याचदा Odontoceti या उपवर्गातील डॉल्फिन व गाधामासा(डॉल्फिन सारखाच, ज्याला इंग्रजीत पॉर्पॉइज म्हणतात) यांना त्यातून वगळण्यात येते. या उपवर्गामधे स्पर्मव्हेल, किलरव्हेल, व बेलुगा व्हेल हे देखील आहेत.
देवमासा 50–0 Ma Eocene – Recent | ||||||
---|---|---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||
|
वर्गीकरण
संपादन- उपवर्ग Mysticeti - यांना वरच्या जबड्यात दातांऐवजी शृंगप्रथिनापासून बनलेली चाळणी सारखी संरचना असते, ज्याला इंग्रजीत बलीन म्हणतात.या बलीनचा उपयोग पाण्यातून प्लवक गाळण्यासाठी केला जातो. या उपवर्गामधे बहुतांश व्हेल्सचा समावेश होतो.
- उपवर्ग Odontoceti - यांना शिकारीसाठी तिक्ष्ण दात असतात.या उपवर्गामधे स्पर्म व्हेल, चोच असलेले व्हेल तसेच डॉल्फिन्सचा स्मावेश होतो.