दुर्गाबाई व्याम (जन्म १९७३: हयात) या आदिवासी गोंड जमातीतील कलाकार-चित्रकार आहेत.[१] भारताच्या पूर्व मध्य प्रदेशातील त्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म बुरबासपूर येथे झाला.[२] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित 'भीमायन: अस्पृश्यतेचे अनुभव या श्रीविद्या नटराजन आणि एस. आनंद लिखित पुस्तकातील चित्रे दुर्गाबाई यांनी काढलेली आहेत.[३]

दुर्गाबाई व्याम
जन्म १९७३
निवासस्थान भोपाळ
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
मूळ गाव मध्य प्रदेश
ख्याती आदिवासी गोंड महिला चित्रकार
जोडीदार सुभाष व्याम
गोंड आदिवासी चित्रकला

चित्रकार म्हणून प्रवास

संपादन

दुर्गाबाई यांचे दीर जनघड श्याम यांनी त्यांच्यातील चित्रकलेच्या प्राविण्याची दखल घेतली. आदिवासी जमातीत घरांवरील भिंतींवर पारंपरिक चित्रे काढली जातात. दुर्गाबाईंनी काढलेल्या अशा चित्रांमधूनच त्यांच्या चित्रकलेची ओळख झाली.[४]

कलेची वैशिष्ट्ये

संपादन

दुर्गाबाईंनी काढलेली चित्रे ही "कथारूप" आहेत असे मानले जाते. त्यांचे प्रत्येक चित्र पाहिल्यावर त्यातून एक कथा अनुभवायला मिळते असे त्याच्या चित्रांविषयी नोंदवले जाते. लहानपणी आपल्या आजीकडून एकलेल्या गोष्टी त्यांच्या चित्रांमधे दिसून येतात हे त्यांच्या चित्रांचे वेगळेपण सांगता येईल.[२]

कलाकार म्हणून प्रसिद्धी

संपादन

दुर्गाबाई या आपले पती सुभाष व्याम यांच्यासह भोपाळ येथे स्थायिक झाल्या. तेथेच त्यांनी आपली कलेची कारकीर्द सुरू केली. त्यांची चित्रे वेगवेगळ्या स्थानिक आणि देशविदेशातील प्रदर्शनांचा आकर्षण विषय ठरली आहेत.

कलेचा विकास

संपादन

दुर्गाबाई यांनी आपल्या कलेला साचेबद्ध न ठेवता त्यांनी आपल्या कलेत प्रयोगशीलता आणली आहे. नैसर्गिक रंगांचा वापर करतानाच त्या रासायनिक रंगांचा वापर करूनही चित्रे काढतात. पारंपरिक आदिवासी चित्रांच्या जोडीनेच संवेदनशील सामाजिक घटनाही त्या चित्रित करतात. उदा. सामाजिक विषमता, ९ सप्टेंबर रोजी अमेरिकेवर झालेला हल्ला इ.[५]

पुस्तकांमधील चित्रे

संपादन

दुर्गाबाई यांनी विविध पुस्तकांसाठीही चित्रे काढली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित 'भीमायन: अस्पृश्यतेचे अनुभव' या पुस्तकातील त्यांची चित्रे जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरली आहेत. या जोडीने 'द नाईट लाईफ आफ ट्रीज', 'सुलतान्स ड्रीम्स', 'माई अँड हर फ्रेंड्स' या पुस्तकांसाठीही त्यांनी चित्रे काढली आहेत.[५]

पुरस्कार

संपादन
  • इटलीचा बोलोगोना रग्गझी पुरस्कार
  • हस्त शिल्प विकास निगम पुरस्कार (२००२)
  • कथा चित्रकला रनर्स अप अवाॅर्ड
  • राणी दुर्गावती पुरस्कार (२००९)[५]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "The Sunday Tribune - Books". www.tribuneindia.com. 2019-03-08 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Durga Bai | Paintings by Durga Bai | Durga Bai Painting - Saffronart.com". Saffronart. 2019-03-08 रोजी पाहिले.
  3. ^ कुल, रघुवीर (२३.९.२०१२). "सृजनाचा विलक्षण सुंदर आविष्कार". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "Durga Bai | Buy Original Art Online | Artsper". Artsper | Buy Original Art Online | Art for Sale (इंग्रजी भाषेत). 2019-03-08 रोजी पाहिले.
  5. ^ a b c "Durga Bai". sutragallery (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2020-02-16. 2019-03-08 रोजी पाहिले.