दालन:बौद्ध धर्म/उवाच/2
< दालन:बौद्ध धर्म | उवाच
बुद्ध कोणी परका नाही. कोणत्याही अर्थाने परका नाही. वैरी तर नाहीच नाही. खरे तर तो आपल्याच अंतःशक्तीचे साकार रूप आहे -- आपल्याच सर्वस्वाचे अस्सल सार आहे. आपण पूर्णपणे फुलल्यावर जसे दिसू, अगदी तंतोतंत तसा बुद्ध आहे. किंबहुना, आपण त्याचे अविकसित पूर्वरूप आहोत आणि तो आपले विकसित उत्तररूप आहे.
~आ.ह. साळुंखे (सर्वोत्तम भूमिपुत्र: गोतम बुद्ध)