दामू केंकरे (मे ५, १९२८ - सप्टेंबर २८, २००८) हे मराठी नाट्यदिग्दर्शक होते.

जन्म मे ५, १९२८
मृत्यू सप्टेंबर २८, २००८
मुंबई, महाराष्ट्र, भारत
इतर नावे दामू केंकरे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र दिग्दर्शन (नाट्य)
अध्यापन (कला)
भाषा मराठी
पत्नी ललिता केंकरे
अपत्ये विजय केंकरे

दामू केंकऱ्यांचा जन्म मे ५, १९२८ रोजी झाला.
मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या कलाशिक्षण संस्थेत ते १९५७ सालापासून १९७८ सालापर्यंत कला शिकवीत होते. यादरम्यान त्यांची नाट्यकारकीर्द चालू होतीच. गोवा हिंदू असोसिएशन संस्थेकरता त्यांनी बरीच नाटके बसवली.
सप्टेंबर २८, २००८ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.

कारकीर्द

संपादन

नाटके

संपादन
नाटक वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
सभ्य गृहस्थ १९७३ मराठी दिग्दर्शन
असतं तसं नसतं मराठी दिग्दर्शन
अखेरचा सवाल १९७४ मराठी दिग्दर्शन
सूर्याची पिल्ले १९७८ मराठी दिग्दर्शन
बॅरिस्टर मराठी दिग्दर्शन
कारटी प्रेमात पडली मराठी दिग्दर्शन
दुर्गी मराठी दिग्दर्शन
जिथे चंद्र उगवत नाही मराठी दिग्दर्शन
माणूस नावाचे बेट १९५६ मराठी दिग्दर्शन
तू तर चाफेकळी १९९४ मराठी दिग्दर्शन
संगीत म्युनिसिपालटी १९४७ मराठी
सत्तेचे गुलाम १९४९ मराठी
साष्टांग नमस्कार १९५० मराठी
दुसरा पेशवा १९५९ मराठी
सवाई माधवराव यांचा मृत्यू १९६३ मराठी
वाजे पाऊल आपले १९६८ मराठी
वल्लभपूरची दंतकथा १९७० मराठी
बिऱ्हाड बाजलं १९७२ मराठी
गृहस्थ १९५५ मराठी
आपलं बुवा असं आहे १९७९ मराठी
कालचक्र १९८७ मराठी

चित्रपट

संपादन
  • मोहरे (अभिनय)

दामू केंकरे यांनी 'माझे गुरू' नावाचे पुस्तकही लिहिलेले आहे.