दाढ
दाढ हा तोंडाचे मागील भागास असलेला एक विशिष्ट प्रकारचा दात असतो. तो चपटा असतो. सस्तन प्राण्यात ती चांगली विकसीत असते.त्याचा वापर हा चर्वण करण्यास प्रामुख्याने होतो.सस्तन प्राण्यांमध्ये यात अनेक प्रकारच्या विविधता आढळून येतात.
मानवामध्ये याला चार अथवा क्वचित पाच उंचवटे असतात.मध्यावर हे निमुळते होत जातात.शेवटून तिसऱ्या दाढेस अक्कल दाढ म्हणतात. ही अक्कलदाढ वयाचे विशीनंतर उगवते. सहसा अक्कलदाढ ही उगवणारा शेवटचा दात असतो.वेगवेगळ्या लोकांमध्ये याचे येण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो.काहींना तर अक्कलदाढ उगवतच नाही.
याचा आकार सर्वसाधारणपणे एकसारखाच दिसत असला तरीही, याची मूळे ही वेगवेगळ्या प्रकारची असतात.
स्रोत
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |