अक्कल दाढा (Wisdom Teeth) या मानवाच्या तोंडात सर्वात शेवटी येणारे दात असतात. ह्या १७ ते २५ या वयात दुसऱ्या दाढेच्या पलीकडे येतात. माणसाला जबड्याच्या वरच्या बाजूला दोन आणि खालच्या बाजूला दोन अश्या जास्तीत जास्त एकूण चार अक्कल दाढा येऊ शकतात. काही जणांना एकही अक्कल दाढ येत नाही तर काही जणांना एकापेक्षा अधिक अक्कल दाढा येऊ शकतात. त्यांची वाढ होण्यास पुरेशी जागा नसल्याने त्यांचे उगवणे दुःखदायक असते. फार त्रास होऊ लागल्यास दंत वैद्य त्या उपटून टाकायचा सल्ला देतात.

आकृतीत- A,D ह्या अक्कलदाढा आहेत. B ही सामान्य दाढ आहे.

.[][].

अक्कल दाढ दुखणे

संपादन

मानवास सामान्यत्वे नेहमीच्या आठ दाढा असतात. तोंडात खालच्या बाजूच्या उजव्या बाजूस दोन, डाव्या बाजूस दोन आणि वरच्या बाजूच्या उजव्या-डाव्या बाजूला दोन-दोन अश्या एकूण चार. त्यांना पहिला मोलर (दाढ) व दुसरा मोलर म्हणतात. जेव्हा तिसरी दाढ उगवते तिला अक्कल दाढ किंवा तिसरा मोलर (मराठी-तिसरी दाढ, इंग्रजी- Third Molar) म्हणातात. अक्कल दाढ हा मानवाच्या तोंडातील सर्वात शेवटचा दात असतो. काही लोकांना अक्कल दाढा उगतात तर काहींना अजिबात उगवत नाहीत. अक्कल दाढा उगवत असताना पुरेशी जागा नसल्यामुळे अक्कल दाढा एक आणि दोन क्रमांकाच्या दाढेला ढकलतात त्यामुळे वेदना होतात, हिरडी सुजते आणि केव्हा केव्हा डोकेसुद्धा दुखू शकते.

अक्कल दाढेमुळे या दाढेच्या पुढची दाढ तिरपी होऊ शकते व वरच्या व खालच्या अक्कल दाढांमुळे गाल आतून चावला जातो व त्यामुळे तोंडात गालाला आतून जखम होते. अश्या परिस्थितीत डॉक्टर अक्कल दाढ शस्त्रक्रियेद्वारे उपटून काढून टाकावी लागेल असे सांगतात. सामान्यतः अक्कल दाढेमुळे अन्न हिरडीत अडकते व अक्कल दाढेजवळ असलेल्या हिरडीला सूज येऊन वेदना होतात.

अक्कल दाढ काढण्याची शस्त्रक्रिया

संपादन

अक्कल दाढ उपटण्याच्या प्रक्रिया ओरल सर्जन (मुख शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर)-दातांचा डॉक्टर करतो. त्यासाठी डॉक्टर लोकल अनेस्थेशिया, म्हणजेच ज्या जागेवर शस्त्रक्रिया करायची आहे तिथे बधिर करण्याचे इंजेक्शन देतो. दाढ जर हिरडीखाली अर्धवट किंवा पूर्ण आलेली असेल तर सर्जन हिरडीला कट करून दाढेला मोकळी करतो. त्यानंतर शास्त्रक्रियेच्या साहित्याने दाताला टूथ साॅकेटमधून वर ढकलतो.. अक्कल दाढ उपटल्यानंतर हिरडीला‌ एक-द़ोन टाके घालतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ देशमुख, डॉ.अनिल. पुढारी https://web.archive.org/web/20200111191551/http://www.pudhari.news/news/Aarogya/aarogya-wisdom-teeth-issue/m/. 2020-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ जानेवारी २०२० रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ WebMD.com https://www.webmd.com/oral-health/wisdom-teeth |दुवा= शीर्षक हरवले (सहाय्य). १२ जानेवारी २०२० रोजी पाहिले. |पहिले नाव= missing |पहिले नाव= (सहाय्य)