दाऊदी बोहरा
दाऊदी बोहरा (Dawoodi Bohra) हा बोहरा समुदायाचा एक छोटा भाग आहे. हा समुदाय इस्माइली शिया गटाच्या आचारविचारांचे पालन करतो. दाउदी बोहरा २१ इमाम असल्याचं मानतात. तैयब अबुल कासिम त्यांचे शेवटचे इमाम होते. त्यानंतर आध्यात्मिक गुरूंची परंपरा या समुदायात आहे. त्यांना दाई म्हणले जाते. सैय्यदना बुऱ्हानुद्दीन रब्बानी ५२ वे दाई होते. २०१४ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या दोन मुलांमध्ये उत्तराधिकारी होण्यावरून वाद झाला. हा वाद न्यायालयात गेला. दाऊदी बोहरा समुदाय गुजरात आणि महाराष्ट्रात आहे. पाकिस्तान आणि येमनमध्येही या समुदायाचे समर्थक आहेत. यशस्वी व्यापारी समाज म्हणून दाऊदी बोहरा ओळखला जातो.