दशमान पद्धत

(दशमान पद्धती या पानावरून पुनर्निर्देशित)


दशमान पद्धत संक्षिप्त सूची
संख्या मराठी संस्कृत
एक एकं
१० दहा दशम्‌
१०० शंभर शतं
१,००० हजार सहस्रम्‌
१०,००० दहा हजार अयुतम्‌
१,००,००० लाख लक्षम्‌
१०,००,००० दहा लाख प्रयुतम्‌
१,००,००,००० कोटी कोटिः
१० दहा कोटी अर्बुदः
१० अब्ज अब्जम्‌
१०१० खर्व खर्वः
१०११ निखर्व निखर्वम्‌
१०१२ महपद्‌म महापद्मः
१०१३ शंकु शंकुः
१०१४ जलधी जलधिः
१०१५ अन्त्य अन्त्यम्‌
१०१६ मध्य मध्यम्‌
१०१७ परार्ध परार्धम्‌

अतिप्राचीन भारतामधे गणित शास्त्रावर बरेच संशोधन झाले आहे. त्यावेळापासून भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक असे म्हणले जाते. हेच अंक (१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, ०) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. यातील दहाव्या चिन्हाच्या(अंक-०) शोधामुळे आपल्या दशमान पद्धतीला सुरुवात झाली.

या दहाव्या अंकास संस्कृत भाषेत शून्य हे नाव आहे. "ख", "गगन", "आकाश", "नभ", "अनंत", "रिक्त", "पुज्य" अशी अनेक नावे त्यावेळी वापरली जात असत. आता ही शिक्षक अंक शिकवताना 'एकावर पुज्य दहा, दोनवर पुज्य वीस' अशी उजळणी घेतात. या (शून्य) अंकाची गरज असल्याचे प्रथम भारतीय गणितज्ञांना जाणवले.

आसा ह्या वैदिक काळाच्या आरंभी होऊन गेलेल्या वायव्य भारतात राहाणाऱ्या भारतीय गणितज्ञांनी जगात सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. अंकांच्या स्थानानुसार त्याची किंमत बदलेल या आसा यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा रितीने लिहिलेले आकडे हिंदासा (हिंद देशातील आसा) या नावाने ओळखले जाऊ लागले. आसांच्या या शोधामुळे गणिताची प्रगती वेगाने होण्याला हातभार लागला.

ऋग्वेदात दशमान पद्धतीचा वापर अनेक ऋचांमध्ये आहे. त्यामुळे ऋग्वेद काळा आधीपासून ही पद्धती रूढ होती हे दिसते.

संदर्भ

संपादन

शोधांच्या जन्मकथा - भाग १, लेखिका- नंदिनी थत्ते, ग्रंथघर प्रकाशन, आवृत्ती - १९८९, पान ४ - ७, पान ५३.


हे सुद्धा पहा

द्विमान पद्धत

पंचमान पद्धत

द्वादशमान पद्धत

षोडषमान पद्धत

रोमन पद्धत