दया बाई

भारतीय सामाजिक कार्यकर्त्या


दया बाई (जन्म नाव मर्सी मॅथ्यू) या केरळमधील एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या मध्य भारतात राहणाऱ्या आदिवासींसाठी काम करतात. त्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील बारूल गावात राहतात.

दया बाई
जन्म मर्सी मॅथ्यू
1940 (age अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२")अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२"
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा सामाजिक कार्यकर्त्या
ख्याती आदिवासी उत्थान

प्रारंभिक जीवन संपादन

मर्सी मॅथ्यू १९४० मध्ये केरळच्या पाला येथील एका समृद्ध ख्रिश्चन कुटुंबात जन्मल्या. [१] यांचा देवावर दृढ विश्वास होता. त्यांचे बालपण आनंदी होते. [२]

समाजकार्य संपादन

त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी नन बनण्यासाठी पाल गाव सोडले. [३] नंतर मध्य भारतातील आदिवासी लोकांसाठी काम करण्यासाठी त्यांनी नन बनण्याचा विचार सोडून दिला. आदिवासींसाठी त्या प्रेरणादायी भाषणे देतात, सत्याग्रह करतात आणि स्थानिक अधिकाऱ्यांना शाळा उघडण्यासाठी दबाव आणतात. यामुळे मध्य प्रदेशातील दुर्लक्षित आदिवासी गावांना सक्षम बनवने शक्य होत आहे. बिहार, हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील वनवासी आणि ग्रामस्थांचे त्या प्रतिनिधित्व करतात. त्या नर्मदा बचाओ आंदोलन आणि चेंगरा आंदोलनाशी संबंधित होत्या. त्यांनी बांगलादेशातील युद्धाच्या वेळी तेथील सामान्य लोकांसाठीही आपली सेवा दिली होती. दयाबाई, ज्या मुक्तीच्या धर्मशास्त्राचा अभ्यास करतात, मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील गोंडांमध्ये स्थायिक झाल्या आहेत. त्यांनी बारूल गावात शाळा काढली. दयाबाई प्रत्येक गावाला भेट देतात आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करून पुढच्या गावात जातात. [४]

त्यांनी गरिबी निर्मूलनाचे साधन म्हणून १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात स्वयं सहाय्यता समूह सुरू केला. यामुळे त्याणा मध्यस्थी, सावकार आणि गावप्रमुखांचा राग सहन करावा लागला. त्यांनी बँकेतील महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या पदाचा उपयोग गरीब आणि दुःखी गवकऱ्यांच्या उत्थानासाठी करण्यास सांगितले. [५]

 
दया बाई

पुरस्कार संपादन

दयाबाईंना २००७ मध्ये वनिता वुमन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. [६] जानेवारी २०१२ मध्ये त्यांना गुड समेरिटन नॅशनल अवॉर्ड (कोट्टायम सोशल सर्व्हिस सोसायटी आणि अगापे मूव्हमेंट, शिकागो यांनी स्थापन केलेली संस्था) देऊन सन्मानित करण्यात आले. [७]

वारसा संपादन

ओटायल किंवा 'वन पर्सन' हा शायनी जेकब बेंजामिनचा दयाबाईवर एक तासांचा माहितीपट आहे. [४] चित्रपटसृष्टीत नावाजलेले व्यक्तिमत्त्व असलेल्या नंदिता दास यांनी २००५ मध्ये त्यांच्या जीवनाची प्रेरणा म्हणून त्यांना श्रद्धांजली लिहिली. [८]

चित्रपट संपादन

तिने कंठण - द लव्हर ऑफ कलर २०२१ या चित्रपटात मुख्य भूमिका केली.

संदर्भ संपादन

  1. ^ Suneetha, B. (2010-11-26). "Face of compassion". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-02-26 रोजी पाहिले.
  2. ^ "daya bai,lady of fire". Archived from the original on 2018-12-25. 2021-09-14 रोजी पाहिले.
  3. ^ "Policies of Church contrary to Christ". Archived from the original on 2018-06-25. 2021-09-14 रोजी पाहिले.
  4. ^ a b Face of compassion
  5. ^ "One-woman army drives financial inclusion in rural Madhya Pradesh". Vinson Kurian. The Hindu. 31 January 2012.
  6. ^ Kiran Bedi calls for change in education system[permanent dead link]
  7. ^ Good Samaritan National Award presented to Dayabai
  8. ^ "Mercy Mathew". Archived from the original on 2018-03-22. 2021-09-14 रोजी पाहिले.

 

अधिक वाचन संपादन

  • नायर, श्रीजय (२९ डिसेंबर २०१५). "हाऊ मर्सी बीकेम दया बाई". डेक्कन क्रॉनिकल. १८ सप्टेंबर २०१९ रोजी पुनर्प्राप्त.

बाह्य दुवे संपादन

  • "दया बाई बद्दल माहितीपट" (इंग्रजी भाषेत). एम टीव्ही ऑर्थोडॉक्स टीव्ही. १८ सप्टेंबर २०१९ रोजी दाखिवला गेला.