थाळनेर किल्ला

महाराष्ट्रातील गाव


थाळनेर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. थाळनेर म्हणजे थळ + निर या शब्दांची संधी आहे. थळ म्हणजे जमीन आणि निर म्हणजे पाणी. जेथे समृद्ध जमीन आहे आणि मुबलक पाणी आहे असे थाळनेर.

थाळनेर

थाळनेरचा नकाशा
नाव थाळनेर
उंची १०० फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण धुळे, महाराष्ट्र
जवळचे गाव थाळनेर गाव,धुळे
डोंगररांग डोंगररांग नाही.
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}

भौगोलिक स्थान

संपादन

धुळे जिल्हा हा खानदेशातील एक जिल्हा आहे. धुळे जिल्ह्यातील थाळनेरचा किल्ला हा इतिहासप्रसिद्ध किल्ला असून तो धुळ्याच्या ईशान्य दिशेला आहे. तापी नदीच्या काठावर वसलेल्या थाळनेर गावालगतच थाळनेरचा किल्ला आहे.

मराठा थाळनेर किल्ला ?

संपादन

धुळ्यापासून साधारण ५० कि.मी. अंतरावर थाळनेर किल्ला असून धुळ्यापासून थाळनेरला जाण्यासाठी एस.टी. बसेसची नियमित सेवा उपलब्ध आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूरकडून तसेच जळगांव जिल्ह्यातील चोपडा या गावांकडूनही आपण थाळनेर येथे पोहोचू शकतो.

== मराठा निंबाळकर == दिल्लीमध्ये त्यावेळी थाळनेर व करवंद या गावची वतनदारी निंबाळकर घराणयाकडे होती. निंबाळकर ने इ.स. १३७० मध्ये त्याने सत्ता स्थापन करून थाळनेर येथे किल्ला बांधला.

थाळनेरच्या किल्ल्यावर सुरुवातीला निंबाळकर घराण्याची सत्ता होती. इ.स.१६०० मध्ये मोगल सुल्तान याने निंबाळकर पद्मराजे यांचा पराभव करून थाळनेरवर कब्जा मिळवला.

मोगल सुल्तान कडून हा किल्ला पुढे परत मराठ्यांच्या ताब्यात आला. निंबाळकरांच्या कडून थाळनेर हा होळकरांकडे गेला. थॉमस हिस्लॉप याने इ.स. १८१८ मध्ये तो इंग्रजी अंमलाखाली आणला. पण इंग्रजांना मात्र प्रखर झुंज द्यावी लागली. यात मराठ्यांचे 12 ते 18 लोक ठार झाले. इंग्रजांचे 45 लोक मारले गेले. यात त्यांचे सात अधिकारीही मारले गेले.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

संपादन

तापी नदीच्या काठावर असलेल्या एका लहानश्या टेकडीवजा जागेवर साधारण त्रिकोणी आकाराचा किल्ला बांधण्यात आला. तटबंदी आणि भक्कम बुरुज बांधून हा किल्ला अभेद्य करण्यात आला. एक बाजूने तापीनदी असल्याने ती बाजू अतिशय संरक्षित झाली होती. किल्ल्यामध्ये येण्याचा एक मार्ग असल्यामुळे त्याबाजूला दरवाजा बांधलेला होता. तो आता काळाच्या ओघात नष्ट झाला आहे. तापी नदीचे पाणी किल्ल्याच्या पायथ्याला धडकून ते पश्चिमेकडे वळण घेते. या पाण्याने संबध टेकडी हळूहळू कापून काढल्यामुळे या बाजूची संपूर्ण तटबंदी ढासळली आहे. अत्यंत समृद्ध आणि बलदंड असलेला थाळनेरचा किल्ला आज मात्र दुर्लक्षीत झाल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचला आहे.

पराक्रमाची गाथा उराशी कवटाळणारा थाळनेरचा किल्ला

हे सुद्धा पहा

संपादन