थंडाई हे एक पेय आहे. महाशिवरात्री आणि होळी या सणांच्या निमित्ताने ते विशेष करून सेवन केले जाते.[] उन्हाळ्यात ही याचा आस्वाद घेतला जातो.

थंडाई

साहित्य

संपादन

दूध-दीड लिटर

१५ चमचे साखर ,किती गोड आवडते त्यानुसार

१ वाटी भिजवलेली खसखस,१ वाटी भिजवलेले बदाम

पाव वाटी भिजवलेले तुळशीचे बी

१ चमचा वेलदोडा पूड

१ वाटी गुलाबपाणी

साधारण ८-१० तास बदाम व खसखस पाण्यात भिजत घाला दूध थोडे आटवून घ्या, त्यामुळे पाण्याचा अंश कमी होईल. पण बासुंदी होणार नाही याची काळजी घ्या. पूर्ण थंड होऊ द्या. भिजलेल्या बदामाची साले काढा तुळशीचे बी, बदाम, खसखस बारीक वाटून घ्या, वाटताना थोडे दूध घातले तरी चालेल. त्यानंतर साखर, वेलदोडापूड, गुलाबपाणी, गार झालेले दूध, एकत्र करून वरील मिश्रणासह पुन्हा घुसळा.[]खूप गार हवे असल्यास मिक्सर मध्ये घुसळताना बर्फ घालायला हरकत नाही. चवीनुसार हवी असल्यास आणखी साखर घाला.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Holi Celebrations: How to Make Thandai, the Popular Festive Drink". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.
  2. ^ Aggarwal, Uma (2016-01-11). Incredible Taste of Indian Vegetarian Cuisine (इंग्रजी भाषेत). Allied Publishers. ISBN 978-93-85926-02-0.
  3. ^ "Thandai: the summer drink that celebrates the spirit of Holi". Condé Nast Traveller India (इंग्रजी भाषेत). 2021-03-26. 2021-03-27 रोजी पाहिले.