तेलुगू सिनेमा किंवा टॉलीवुड (तेलुगू: తెలుగు సినీపరిశ్రమ) ही भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील एक चित्रपट सृष्टी आहे. टॉलीवूड हे नाव तेलुगू भाषिक चित्रपटांसाठी संबोधन्यात येते. तेलुगू चित्रपट उद्योग हा भारतातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग असल्याकारणाने ते चित्रपट निर्मितीचे एक मोठे केंद्र म्हणुन ओळखले जाते ,तसेच तिथे इतर भाषेतील (भारतीय प्रादेशिक भाषा) चित्रपटांची देखील निर्मिती केली जाते. आज तेलुगू सिनेमा हा जगातील सर्वच प्रमुख राष्ट्रांमध्ये प्रदर्शित होतो. भारतात देखील आंध्रप्रदेश सोबत इतर सर्व प्रमुख महानगरात तेलुगू चित्रपट पहावयास मिळतात.

चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे येथील कलाकारांचे मानधन हा एक चर्चेचा विषय बनला आहे.तेलुगू चित्रपट उद्योगाने भारतीय चित्रपट सृष्टित मोठे योगदान केले आहे.आज आंध्रप्रदेशातील ३७०० हुन अधिक चित्रपट गृहातुन टॉलीवुडचे चित्रपट प्रदर्शित होतात.(भारतातील सर्वात जास्त चित्रपट गृह आंध्र प्रदेशात आहेत.) ह्या चित्रपट सृष्टिने अनेक गिनिज बुक रेकॉर्ड्स प्राप्त केले आहेत. जगातील सर्वात मोठी चित्रपट सृष्टी होण्याकडे तेलुगू सिनेमाची वाटचाल आहे.

हे सुद्धा पहा

संपादन