तुरेवाला सर्पगरुड किंवा मूरयला (शास्त्रीय नाव:स्पायलॉर्निस चीला) ही गृध्राद्य पक्षिकुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. याला इंग्लिशमध्ये क्रेस्टेड सर्पंट ईगल तर संस्कृतमध्ये पन्नगाद असे नाव आहे. यांच्या डोक्यावरील असलेल्या तुऱ्यांमुळे या प्रजातीस तुरेवाला असे नाव आहे. या पक्ष्याला मराठीत डोंगर चील(पु.), मोरघार(स्त्री.), हुमन पाखरू(नपुं.), (भंडारा) पिंगुळी(स्त्री.), (ठाणे) गरुड(पु.), मुरयल(पु.), शिखी सर्पगरुड(पु.) असे म्हणतात. हिंदीमध्ये या पक्ष्याला डोगरा चील, फुर्ज बाज, सर्पचर, सर्पवत् गरुड अशी नवे आहेत.

तुरेवाला सर्पगरुड
शास्त्रीय नाव स्पिलॉर्निस चील
(Spilornis cheela)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश क्रेस्टेड सर्पंट-ईगल
(Crested Serpent Eagle)
संस्कृत मालाय, सर्पारि, नागाशी, सर्पांत
तुरेवाला सर्पगरुड
तुरेवाला सर्पगरुड
पनवल्ली, वायनाड येथे दिसलेला तुरेवाला सर्पगरुड
क्रेस्टेड सर्पंट ईगल याच्या पिसांची/पंखांची रचना

माहिती

संपादन

साधारण ७४ सेमी आकाराचा हा गरुड बेडूक, पाली, सरडे, उंदीर, मोर, रानकोंबड़या, सरके पक्षी यांची शिकारी करण्याबरोबरच सापही पकडतो. त्याच्या खाद्यात विषारी सापांचाही समवेश होतो. हा जंगलात राहणारा पक्षी आहे. जंगलातल्या मोकळ्या जागांच्या कडेला असलेल्या झाडांवर बसून तो सरपटणाऱ्या प्राण्यांच्या हालचालीची वाट बघत असतो. तसूभर हलचाल दिसली तरी तो फांदीवरून झेपावतो आणि सुरीसारख्या धारदार नख्यांनी सज्ज अशा पंज्यामधे भक्ष्याला जायबंदी करतो. याने हतबल झालेल्या भक्ष्याचे अणकुचीदार नखे आणि बाकदार चोच यांनी तुकडे करून गिळून टाकतो.

गडद तपकिरी (उदी) रंगाचा हा गरुड संपूर्ण महाराष्ट्रात दिसतो. त्याच्या डोक्यावर काळ्या-पांढऱ्या रंगाचा तुरा असतो. खालून पिंगट उदी रंगाचा असतो. त्यावर काळे-पांढरे ठिपके व बारीक कड्या असतात. उडताना शेपटीवर पांढरा पट्टा दिसतो. तसाच पट्टा पंखांवरही असतो. नर मादी दिसायला सारखे असतात. कर्कश आवाजात शीळ घालीत जंगलाच्या टापूवर एकटा किंवा जोडीने आढळून येतात. त्याची विण डिसेंबर ते मार्च दरम्यान होते. जंगलातल्या एखाद्या उंच झाडावर काड्या-काटक्या आणि मध्यम आकाराच्या फांद्या गोळा करून घरटे केले जाते. लांबून पाहिले असता घरटे एखाद्या ढिगाऱ्यासारखे दिसते. गरुडाची मादी या घरटयात एकच अंडे घालते. घरटे असलेले झाड पडले नाही किंवा तोडल्या गेले नाही तर, वर्षानुवर्ष एकच घरटे वापरले जाते. दरवर्षी घरटयात नवीन काड्या–काटक्यांची भर घातली जाते.

हा मोठा रुबाबदार पक्षी आहे. विशेषतः त्याच्या डोक्यावरचा काळा-पांढरा तुरा मोठा झोकदार दिसतो. त्याची ऐट वाढवतो. उंच आकाशात उडणारा सर्पगरुड त्याच्या पंखांमध्ये असलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सहज ओळखू येतो. उंच उंच आकाशात घिरट्या घालत तो स्वतःच्या राज्याची देखरेख करतो आणि अधूनमधून आरोळी देतो ‘केक केक कीs किs !’ नावाप्रमनेच सर्पगरुड सापांची शिकार करतो. भक्ष्य पंनज्यात धरून ऐसपैस ओटयासारख्या घरट्यात आणून टाकतो. घरट्यातल पिल्लू भक्ष्याचे तुकडे करून गिळायला शिकतं. सुरुवातीलाकापसाच्या गोळ्यासारखा दिसणारागरुडाचा पिल्लू सावकाशीन रंगेबीरंगी दिसायला लागत. उडायलाशिकलेलं पिल्लू घरट्याचा परिसर सोडून बाहेर पडत. स्वतंत्रपणे शिकारी करायला लागतं त्याचापाशी अनुभव नसतो, त्यामुळे नवीन परिसराच्या शोधात चुकून शहरांमध्ये येतं अशा वेळी कावळे टपलेले असतात. त्यांनी पूर्वी कधीही न पाहिलेला हा पाहून पहिला, कि त्याच्या पाठलाग करायला सुरुवात करतात. त्याला दमवतात. कावळयांनपासून सुटका करून घेताना थकलेले, भागलेले असे तरुण गरुड कधीही घरादारांमध्ये येतात. जखमी होतात. अशा वेळी योग्य ते उपचार करून त्यांना लवकरात लवकर त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानात सोडनं आवश्यक असतं. सर्प गरुड विषारी सापही मारून खातो. मग सापाच्या विषारी त्याच्यावर कोणताही परिणाम का होत नाही? उत्तर तुम्ही शोधायचं आहे.