तिवसा विधानसभा मतदारसंघ
तिवसा विधानसभा मतदारसंघ - ३९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, तिवसा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका, मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई, धामणगांव ही महसूल मंडळे, अमरावती तालुक्यातील शिराळा, माहुली जहांगीर, नांदगांव पेठ आणि वालगांव ही महसूल मंडळे आणि भातकुली तालुक्यातील आष्टी, खोलापूर ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. तिवसा हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या यशोमती चंद्रकांत ठाकूर ह्या तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[२]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
संपादनतिवसा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- तिवसा तालुका
- मोर्शी तालुका : नेर पिंगळाई आणि धामणगांव महसूल मंडळे
- अमरावती तालुका : शिराळा, माहुली जहांगीर, नांदगांव पेठ आणि वालगांव महसूल मंडळे
- भातकुली तालुका : आष्टी आणि खोलापूर महसूल मंडळे
तिवसा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादननिवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
तिवसा | ||
उमेदवार | पक्ष | मत |
यशोमती ठाकुर | काँग्रेस | ७३,०५४ |
संजय रावसाहेब बंड | शिवसेना | ४६,९२४ |
डॉ. चंद्रशेखर रामदासपंत कुरळकर | बसपा | ११,८३४ |
SABIRHUSEN AHMEDHUSEN | भाकप | ४,७३५ |
SANJAY PRABHAKARRAO DESHMUKH | अपक्ष | ४,६७४ |
SANDESH SURYBHANJI MESHRAM | अपक्ष | १,४८४ |
DR. GANESH KHARKAR | अपक्ष | १,३६९ |
RAJENDRA SAHEBRAO PARISE | अपक्ष | १,२९६ |
BONDE JAGDISH JAYWANTRAO | स्वभाप | ९१६ |
BALASAHEB ASHADEVI PANDURANG KORATE | अपक्ष | ९०१ |
INGLE VIJAY MAROTRAO | भाबम | ६१३ |
DHARMRAJ DAYARAMSA SHIRBHATE | अपक्ष | ३२९ |
विजयी
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).