टी.एस. ठाकूर
(तिरथ सिंग ठाकुर या पानावरून पुनर्निर्देशित)
तीरथ सिंग तथा टी.एस. ठाकुर (४ जानेवारी, इ.स. १९५३:रामबन, जम्मू आणि काश्मीर, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. ते ३ डिसेंबर, इ.स. २०१५ ते ४ जानेवारी, इ.स. २०१७ या कालखंडात सरन्यायाधीशपदी होते. ते यापूर्वी ते पंजाब, हरयाणा आणि दिल्ली उच्च न्यायालायाचे न्यायाधीश होते.