तिएरा देल फ्वेगो
दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेकडील द्वीपसमूह
तिएरा देल फ्वेगो (स्पॅनिश: Tierra del Fuego) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिण टोकाकडील एक द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह मुख्य खंडापासून मेजेलनच्या सामुद्रधुनीने वेगळा झाला आहे. ४८,१०० वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेले Isla Grande de Tierra del Fuego हे ह्या द्वीपसमूहामधील मुख्य बेट आहे व ते आर्जेन्टिना व चिली ह्या देशांमध्ये विभागले गेले आहे.
हा द्वीपसमूह फर्डिनांड मेजेलनच्या जगप्रवासादरम्यान शोधला गेला.
हे सुद्धा पहा
संपादन- तिएरा देल फ्वेगो - आर्जेन्टिना देशाचा एक प्रांत
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत