तार्तू हे एस्टोनिया ह्या बाल्टिक देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तार्तू शहर एस्टोनियाच्या पूर्व भागात एमाज्योगी नावाच्या नदीवर वसले असून ते एस्टोनियाची राजधानी तालिनच्या १८६ किमी आग्नेयेस तर लात्व्हियाची राजधानी रिगाच्या २४५ किमी ईशान्येस स्थित आहे. एस्टोनियाचे शैक्षणिक व अनुसंधान केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तार्तू येथे देशामधील सर्वात मोठे व प्राचीन तार्तू विद्यापीठ तसेच एस्टोनियाचे सर्वोच्च न्यायालय स्थित आहेत.

तार्तू
Tartu
शहर
ध्वज
चिन्ह
तार्तू is located in एस्टोनिया
तार्तू
तार्तू
तार्तूचे एस्टोनियामधील स्थान

गुणक: 58°23′N 26°43′E / 58.383°N 26.717°E / 58.383; 26.717

देश एस्टोनिया ध्वज एस्टोनिया
स्थापना वर्ष इ.स. १२६२
क्षेत्रफळ ३८.८ चौ. किमी (१५.० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ९३८६५
  - घनता २,४०० /चौ. किमी (६,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + २:००
http://tartu.ee/?lang_id=2

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: