तानिया सचदेव
तनिया सचदेव (जन्म:२० ऑगस्ट,१९८६) ही एक भारतीय बुद्धिबळपटू आहे.तसेच तानिया हिने FIDEचा आंतरराष्ट्रीय मास्टर (आयएम) आणि महिला ग्रॅंडमास्टर (डब्लूजीएम) किताब जिंकला आहे.तसेच ती बुद्धिबळ या खेळाची प्रस्तुतर देखील आहे.[१]
सुरुवातीचे जीवन
संपादनतानियाचा जन्म दिल्लीत १९८६ साली झाला.तानिया ६ वर्षाची असताना तिच्या आईने म्हणजेच अंजु यांनी तिला या खेळाचा परिचय करून दिला.तिच्या पालकांनी तिला व्यावसायिक प्रशिक्षण दिले.[२]आठ वर्षांची असताना तिने पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली.के.सी.जोशी यांनी तिला प्रशिक्षित केले.[३] जोशी आपल्या सुरुवातीच्या काळात आपल्या बालपणी बरेच कार्यक्रम जिंकले होते.तानिया हिने २००२ साली मारवीला मध्ये आशीयाई जूनियर गर्ल्स चैम्पियनशिप जिंकली.[४]
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशंसा
संपादन२००५ मध्ये तिने महिला ग्रॅंडमास्टरचा किताब मिळवून देणारी आठवी भारतीय खेळाडू ठरली.तिने २००६ आणि २००७ मध्ये झालेल्या भारताच्या राष्ट्रीय महिला प्रीमियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये विजय मिळवला.[५]२००७ मध्ये तेहरानमध्ये ९ राऊंडमध्ये सहा गुण मिळवून महिला आशियाई बुद्धिबळ चॅम्पियनशिप देखील जिंकली.२०००मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१६ मध्ये,तानिया ने रेजिझीक ओपन स्पर्धेत सर्वोत्तम स्त्रीचा पुरस्कार जिंकला आणि राष्ट्रकुल महिला स्पर्धेचे विजेतेपद कलुतारा येथे जिंकले.[६]
२००८ मध्ये महिलांच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये तिने भारतीय राष्ट्रीय संघाकडून,२००९ व २०११ मध्ये महिला विश्वचषक बुद्धिबळ चॅम्पियनशीप,२००३ मध्ये महिला आशियाई संघ बुद्धिबळ चॅम्पियनशीप,२००६ मध्ये आशियाई खेळ व २००९ आशियाई इंडोर गेम्समध्ये खेळली आहे.[७]सचदेवने इस्तंबूलमध्ये २०१२ मध्ये महिला बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ३ संघांसाठी वैयक्तिक कांस्यपदक पटकावले.चार रौप्य पदक (२००८,२००९,२०१२ आणि २०१४)पटकावले.(तीन रौप्य आणि एक कांस्य) महिला एशियन टीक चॅम्पियनशिप जिंकली.[८]
वैयक्तिक जीवन
संपादनतानिया सचदेव हिने दिल्लीतील वसंत विहार येथील मॉडर्न स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आणि श्री वेंकटेश्वर कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. ती रेड बुल याची स्पॉन्सर आहे.[९] नोव्हेंबर २०१४ मध्ये तिने दिल्ली मधील आर्किटेक्ट विराज कटारियाशी विवाह केला. ती एक प्रशिक्षित भारतीय शास्त्रीय नृत्यक आहे. तिचे छंद खरेदी करणे आणि वाचन करणे आहे.[१०]
संदर्भ
संपादन- ^ "Tania Sachdev joins the Chessdom commentators team | Chessdom". www.chessdom.com (इंग्रजी भाषेत). 2018-08-21 रोजी पाहिले.
- ^ "The Hindu : Young champions are back". www.thehindu.com. 2018-08-21 रोजी पाहिले.
- ^ "World Championship in U18 categories. 25/10-7/11/1998". old.chess.gr. 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-21 रोजी पाहिले.
- ^ http://chess-results.com, Dipl.Ing. Heinz Herzog -. "Chess-Results Server Chess-results.com - 12th Asian Women Indevidual Chess Championship". chess-results.com. 2018-08-21 रोजी पाहिले.
- ^ "Abhijeet wins Reykjavik Open; Tania makes Grandmaster norm - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2018-08-21 रोजी पाहिले.
- ^ "Improve your chess with Tania Sachdev". Chess News (इंग्रजी भाषेत). 2014-04-07. 2018-08-21 रोजी पाहिले.
- ^ "Don t mind being called a chess hottie: Tania Sachdev". mid-day (इंग्रजी भाषेत). 2014-06-08. 2018-08-21 रोजी पाहिले.
- ^ "https://www.redbull.com/in-en/athlete/tania-sachdev". www.redbull.com (इंग्रजी भाषेत). 2018-08-21 रोजी पाहिले. External link in
|title=
(सहाय्य) - ^ "Tanya Sachdeva". IMDb. 2018-08-21 रोजी पाहिले.
- ^ "तानिया सचदेवा- Navbharattimes Photogallery". https://navbharattimes.indiatimes.com (हिंदी भाषेत). 2018-08-21 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य)