ताज महाल पॅलेस हॉटेल

मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेल
(ताज हॉटेल या पानावरून पुनर्निर्देशित)

ताजमहाल हे मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेल आहे. कुलाब्याजवळ गेट वे ऑफ इंडियाच्या समोर दोन इमारती आहेत. एक ताजमहाल पॅलेस आणि त्याच्या बाजूलाच एक हॉटेलचीच टोलेजंग इमारत. जरी दोन वेगवेगळ्या इमारती दिसत असल्या तरी सुद्धा या दोन्ही इमारती टाटा यांच्या मालकीच्या आहेत व त्या ताजमहाल हॉटेल म्हणून ओळखल्या जातात. या दोनही इमारतींच्या बांधकामाचे आराखडे वेगवेगळया कालावधीमध्ये व वेगवेगळया वास्तुशास्त्रज्ञांकडून झालेले आहेत.

ताजमहाल पॅलेस हॉटेल

जॅकलीन केनेडी, बिल क्लिंटन, हिलरी क्लिंटन, नॉर्वेचे महाराज आणि महाराणी, ए्डिनबर्गचा ड्यूक, वेल्सचा राजपुत्र, रॉजर मूर, जॉन कॉलिस, ॲंजेलिना जॉली, बॅडपीट, हिलरी क्लिंटन, बराक ओबामा या जगप्रसिद्ध व्यक्तींनी ताज पॅलेसला भेट देऊन तेथील आदरातिथ्य घेतलेले आहे.

इतिहास

संपादन

टाटांनी हे ताज हॉटेल उभारण्यामागे जी घटना कारणीभूत झाली ती अशी की, १८६५ मध्ये मुंबईतल्या प्रसिद्ध वॉटसन हॉटेलमध्ये तिथल्या दरबानाने जमशेदजी टाटांना आत जाण्यास मनाई केली होती. कारण ते हॉटेल फक्त इंग्रजांसाठीच होते. हा अपमान सहन न झाल्यामुळे टाटांनी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय तोडीचे हॉटेल बांधण्याचा निश्चय केला होता. त्यातूनच १६ डिसेंबर १९०३ साली ताज हॉटेलची वास्तू बांधली गेली. काही टीकाकार मात्र या गोष्टीशी सहमत नाहीत. मुंबईला साजेसे एखादे हॉटेल उभारा्वे अशी टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकाची इच्छा असल्यामुळे त्याच्या आग्रहाखातर टाटांनी हे हॉटेल बांधले असल्याचे त्यांचे मत आहे.[]

पहिल्या महायुद्धाच्या वेळेस या हॉटेलचे रूपांतर ६०० पलंगाच्या हॉस्पिटलमध्ये झाले होते. आज जी ताज पॅलेसच्या बाजूची टोलेजंग इमारत दिसते आहे ती अपोलो बंदरभागातील हॉटेल 'ग्रीन हॉटेल' म्हणून ओळखली जात होती. स्वस्त किंमतीसाठी आणि रानटी टोळ्यांच्या मेजवानीच्या कार्यक्रमासाठी हे हॉटेल कुप्रसिद्ध होते.[] १९७३ मध्ये टाटांनी हे हॉटेल विकत घेऊन त्याच्या जागी आताची ताज हॉटेलची दुसरी टोलेजंग इमारत बांधलेली आहे.

अपोलो बंदराकडे हॉटेलची मागील बाजू येते. पूर्वेकडे हॉटेलचा दरवाजा आहे. वास्तुशास्त्रज्ञाने तयार केलेला इमारतीचा प्लान बिल्डरच्या लक्षात न आल्यामुळे बंदराकडे हॉटेलची मागील बाजू असल्याचा बऱ्याच जणांचा मोठा गैरसमज झालेला आहे. परंतु हे खरे नाही. बोटीने येणाऱ्या अभ्यागतांना त्यांचे सामान वाहतूक करणे सोयीचे जावे या हेतूने हॉटेलचे बांधकाम अशा पद्धतीने केलेले आहे.

 
ताजमहाल हॉटेल, टॉवर

बांधकाम

संपादन

ताजमहाल हॉटेलचे बांधकाम इंडो सारसेनिक पद्धतीचे असून मूळच्या बांधकामाचा आराखडा सीताराम खंडेराव वैद्य व डी.एन. मिर्झा या भारतीय वास्तुशास्त्रज्ञांनी केलेला आहे व डब्ल्यू.ए. चेंबर्स या इंग्रजी इंजिनीयरनी हे बांधकाम पूर्ण केलेले आहे. भारतामध्ये प्रथमच सरकता जिना या हॉटेलसाठी बसवून वापरण्यात आला होता. हॉटेलमध्ये वापरण्यात आलेली सामुग्री – पंखे, जिने, स्नानगृह, वगैरे प्रथमच अमेरिका, जर्मनी, तुर्कस्तान अशा विविध देशांमधून मागविण्यात आलेली होती. अगदी बटलर सुद्धा इंग्लंडमधून आणले होत. त्याचा घुमट आयफेल टॉवर साठी वापरलेल्या स्टीलपासून बनविण्यात आला असून हे स्टील त्या वेळी टाटांकडूनच आयात केले जात होते.

भोजन कक्ष

संपादन

ह्या हॉटेल परिसरात उत्तम भोजनासाठी काही उपहारगृहे[] आहेत, ती पुढीलप्रमाणे:

  • ॲक्वॅरिस
  • कॉन्टिनेन्टल आणि इटालियन क्विझिन्स
  • गोल्डन ड्रॅगन
  • गोल्डन बेंच
  • झोडियाक ग्रिल
  • मसाला क्राप्ट
  • ले पेटिसेरी
  • वसाबी बाय मोरिमोटो
  • शामियाना
  • शेफ स्टुडिओ
  • सॉक
  • सी लॉज
  • स्टॅबर्ड बार
  • हार्बर बार
 
अरबी समुद्रावरून दिसणारे हॉटेल

२६-११-२००८ रोजीचा दहशतवाद्यांचा हल्ला

संपादन

ताज हॉटेलवर २६ नोव्हेंबर २००८चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामुळे ताजचे आर्थिक नुकसान झाले.[] या हल्ल्याच्या वेळेस काही नागरिकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते आणि जवळजवळ १६७ नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यात काही परदेशी नागरिकांचासुद्धा समावेश होता. तीन दिवस चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये भारतीय कमांडोनी शेवटच्या दिवशी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला.

ताजमहाल हॉटेलमधील ज्या विभागाचे कमी नुकसान झाले होते, ते विभाग दि. २१ डिसेंबर २००८ रोजी पुन्हा सुरू करण्यात आलेले होते. परंतु सर्वांत प्रसिद्ध असलेला ऐतिहासिक वारसा असलेला विभाग चालू होण्यास बरेच महिने जावे लागले.[]

जुलै २००९ मध्ये भारत - अमेरिका संबंध दृढ करण्यासाठी जेव्हा हिलरी क्लिंटन यांनी भारताला भेट दिली होती त्यावेळी या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी या घटनेमध्ये ज्यांना प्राण गमवावे लागले होते त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी व नागरिकांसाठी श्रद्धांजली अर्पण केली होती.[] १५ ऑगस्ट २०१० च्या स्वातंत्र्य दिनी पुनर्रचित ताज महाल हॉटेल नव्याने लोकांसाठी खुले झाले. ६ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे हल्ल्यानंतर हॉटेलला भेट देणारे पहिले परदेशी नागरिक होते. त्यावेळी ताजच्या गच्चीवरून त्यांनी केलेल्या भाषणात ताज हे भारतीयांच्या ताकदीचे व निर्भयपणे घटनेला सामोरी जाऊन पूर्वस्थितीत येण्याच्या गुणधर्माचे प्रतीक असल्याचे सांगितले.[]

साहित्य

संपादन

विल्यम वॉरेन, जी गॉचर (२००७). एशियाज लिजेंडरी हॉटेल : दि रोमान्स ऑफ ट्रॅव्हल. सिंगापूर : पेरीप्लस एडिशन. आयएसबीएन ९७८-०-७९४६-०१७-४. भारतीय लेखक सुलतान रशीद मिर्जा व फरहात उल्ला बैंग यांच्या साहब “ बहादुर ” या लघुकथेत आणि वेद मेहता यांच्या “ डेलीक्यूएंट चाचा ” या कादंबरीमध्ये नमूद केलेले आहे. एका शाळकरी मुलाचे या ठिकाणी भेट देण्याचे स्वप्न कसे पुरे होते, असा विषय असलेल्या “ ताऱ्यांचे बेट ” या मराठी चित्रपटामध्ये या हॉटेलचे वर्णन आलेले आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ एलन, चार्ल्स (३ डिसेंबर २००८) . ""ताज हॉटेल संहारातून पुन्हा उभे राहिले"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "ताज खंड ३२, क्र.३, थर्ड क्वार्टर २००३, फातमा आर झकेरिया संपादित. ताज.मॅगझीन@ताजहॉटेल्स.कॉम" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "हॉटेलची वैशिष्ट्ये" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ रमेश, रणदीप (२७ नोव्हेंबर २००८). ""अजूनही डझनभर लोक दहशवादयांकडे ओलीस"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ पसरीचा, अंजना (२००९-१२-२१). ""हल्ल्यानंतर हॉटेल जनतेसाठी खुले".[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश भाषेत). URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ मोहम्मद , अर्शद (१८ जुलै २००९). ""क्लिंटनची मुंबई भेट"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ ""ओबामांची मुंबईला भेट"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)