तपांबर
तपांबर (इंग्लिश: Troposphere, ट्रपॉस्फियर) हा पृथ्वीच्या वातावरणातला सर्वांत खालचा, भूपृष्ठालगतचा थर आहे. वातावरणातील हवेच्या वस्तुमानापैकी ८०% वस्तुमान आणि हवेतील बाष्पापैकी ९०% बाष्प या थरात सामावले आहे. अर्थातच यामुळे इतर वातावरणीय थरांपेक्षा या थरात हवेची घनता जास्त असते. तपांबराची जाडी विषुववृत्ताजवळ १५ कि.मी., तर ध्रुवीय प्रदेशांत १० कि.मी. आढळते [१].
ढग, पाऊस, विजांचा कडकडाट, हिमवृष्टी इत्यादी वातावरणीय घडामोडी तपांबरातच घडतात; यामुळे वातावरणीय अभ्यासाच्या दृष्टीने तपांबरास विशेष महत्त्व आहे.
210.212.180.35 १७:१८, १ डिसेंबर २०१५ (IST)== तापमान == भूपृष्ठाच्या संपर्कामुळे भूपृष्ठालगतच्या तपांबराचे तापमान अधिक असते आणि तपांबराची उंची जसजशी वाढत जाईल, तसतसे तापमान घटत जाते. सर्वसाधारणपणे दर किलोमीटर उंचीगणिक तपांबरातील तापमान ६.५ ° सेल्सियसांनी घटत जाते [१].
तपस्तब्धी
संपादनतपांबराच्या सर्वांत वरच्या भागात हवा विरळ असते आणि त्यामुळे तिथे उंचीनुसार तापमान बदलत नाही. म्हणून तपांबराच्या या विरळ सीमाक्षेत्रास तपस्तब्धी असे म्हणतात [१]. ga
संदर्भ व नोंदी
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |