डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण ही वास्तू महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांच्या ठिकाणी बांधण्यात आली आहे. हे भवन तीन भागामध्ये विभागले असून मध्यभागातील इमारत ही सांस्कृतिक सभागृहाकरीता आहे. एका इमारतीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत असणारी सर्व महामंडळे, सामाजिक न्याय जिल्हा कार्यालय, जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय व इतर प्रशासकीय कार्यालये आहेत. दुसऱ्या इमारतीमध्ये वाचनालय, संगणक कक्ष, सभागृह, सायबर कॅफे, कला दालन, प्रदर्शनीय दालन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामुळे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना या एकाच ठिकाणी घेता येतो.[१]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत