डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (जपान)

जपानच्या वाकायामा प्रांत मधील पुतळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा जपानच्या वाकायामा प्रांतातील कोयासन विद्यापीठामधील पूर्णाकृती पुतळा आहे. डॉ. आंबेडकरांच्या या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १० सप्टेंबर, २०१५ रोजी करण्यात आले.[१][२][३][४]

जपानच्या कोयासन विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा
जपानच्या कोयासन विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा
10 सप्टेंबर 2015 रोजी जपानच्या कोयासन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, त्याच दिवशी हा फोटो घेण्यात आला. आंबेडकरी लोक फोटोत आंबेडकरांच्या पुतळ्यासह दिसत आहेत.

दाजी पांचाळ यांनी हा आंबेडकरांचा पुतळा बनवला आहे. हा पुतळा साडेसहा फूट उंचीचा पंचधातूंचा आहे. चार फुटाचा चौथरा व साडेसहा फूट उंचीचा मिळून सोडदहा फूट उंचींची कलाकृती आहे. याला साधारणपणे २२.२५ लाख रुपये खर्च लागला आहे.[५][६]

इतिहास

संपादन

पर्यटनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याचा एक भाग म्हणून, जपानमधील वाकायामा राज्याबरोबर महाराष्ट्र सरकारचा ऑक्टोबर २०१३मध्ये सामंजस्य करार झाला होता. जपान हे बौद्धराष्ट्र मानले जाते. बौद्धांमध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या ‘कोयासान’ टेकडीवर बाबासाहेबांचा पुतळा उभारावा अशी जपान्यांची इच्छा होती. त्यानुसार कोयासान येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरवण्यात आले. वर्ल्ड हेरिटेज साइटमध्येही ‘कोयासान’चा समावेश होतो. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) ‘कोयासान’वर हा पुतळा मार्च २०१५ मध्ये उभारण्यात आला आहे. या स्थानावर प्रथमच एखाद्या परदेशी राष्ट्रपुरुषाचा पुतळा उभारला गेला आहे. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पंच धातूचा असून, त्याची उंची साडेदहा फूट आहे. यामध्ये पुतळा साडेसहा फूट, तर त्याचा चौथरा चार फूट उंचीचा आहे. शिल्पकार बाळकृष्ण (दाजी) पांचाळ यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे हा पुतळा साकारला होता. या पुतळ्याचे काम डिसेंबर २०१४ पासून सुरू झाले आणि मार्च २०१५ अखेरीस पूर्णत्वास आले आहे.

पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १० सप्टेंबर २०१५ रोजी करण्यात आले. या वेळी वाकायामा प्रांताचे गव्हर्नर योशिनोबू निसाका, भंते कोबो डायशी, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार रामदास आठवले, खासदार अमर साबळे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस आणि वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोसायन विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू या वेळी उपस्थित होते.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "डॉ. आंबेडकरांना जपानमध्ये मानवंदना -Maharashtra Times". Maharashtra Times. 2015-09-11. 2018-07-04 रोजी पाहिले.
  2. ^ "जपानमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण". Lokmat. 2015-09-10. 2018-07-04 रोजी पाहिले.
  3. ^ "डॉ. बाबासाहेबांचा जपानमध्ये पुतळा !". Lokmat. 2015-09-11. 2018-07-04 रोजी पाहिले.
  4. ^ "https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=Eh5j9592//8=". www.mahanews.gov.in. 2018-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-04 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  5. ^ "जपानमध्ये आंबेडकर पुतळ्याचे अनावरण". 11 सप्टें 2015.
  6. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे जपानमध्ये अनावरण". divyamarathi. 10 सप्टें 2015.