केतकी पाटील

(डॉ. केतकी पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)

जळगाव जिल्ह्यातील उच्च शिक्षित युवा राजकारण्यांमध्ये डॉ. केतकी उल्हास पाटील (९ ऑगस्ट १९८८) यांचे नाव नेहमीच अग्रस्थानी असते. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुण्याच्या डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून केतकी पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. [] त्यानंतर केतकी यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाची धुरा सांभाळायला सुरुवात केली. मलकापूर येथील हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्याशी डॉ.केतकी यांचा विवाह झाला असून त्यांना किवा व सारा नावाच्या दोन गोड कन्या आहेत. वैद्यकीय क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्राचा वारसाही डॉ. केतकी पाटील यांनी जोपासला आहे. वडील तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या राजकीय वारसदार म्हणूनही डॉ. केतकी पाटील यांच्याकडे पाहिले जाते. [] रावेर लोकसभा मतदार संघात त्यांनी स्वतःचा दांडगा जनसंपर्क तयार केला आहे.

डॉ. केतकी पाटील
डॉ. केतकी पाटील
जन्म ९ ऑगस्ट, १९८८ (1988-08-09) (वय: ३६)
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण एमबीबीएस, एमडी
जोडीदार डॉ. वैभव पाटील
अपत्ये

२ मुली
किवा

सारा
वडील डॉ.उल्हास वासुदेव पाटील
आई डॉ. वर्षा पाटील

डॉ.केतकी पाटील यांचा जन्म ९ ऑगस्ट १९८८ रोजी जळगाव येथे झाला. आई व वडील दोन्ही वैद्यकीय क्षेत्रात कार्यात कार्यरत असल्याने लहानपणापासून केतकी यांनाही वैद्यकीय क्षेत्राची ओढ होती. शालेय जीवनात अत्यंत हुशार विद्यार्थीनी म्हणून केतकी यांना ओळखले जात असे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्याच्या डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून केतकी पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी वडिलांच्या डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पीटलमध्ये प्रॅक्टीस सुरू केली. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला अत्याधुनिक स्वरूपाची सेवा आणि उपचार मिळण्यासाठी डॉ. केतकी या नेहमीच आग्रही राहतात. डॉ. केतकी पाटील यांनी यूएसए, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, बेल्जियम, स्वित्झर्लंड, फिनलंड अशा विविध देशांना भेटी देत त्या देशातील वैद्यकीय क्षेत्रातील नवतंत्रज्ञान व ट्रेंड अभ्यासले आहेत.

मध्यंतरी कोरोनाच्या दोन लाटा आल्या. जळगाव जिल्ह्यात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा देणारे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय हे एकमेव असल्याने या रूग्णालयाचा समाजाला उपयोग व्हावा या उद्देशाने डॉ. केतकी आणि डॉ. वैभव पाटील यांनी फ्रंट वॉरीयर म्हणून जबाबदारी यशस्वरित्या पार पडली. [] गोदावरी फाउंडेशनच्या सचिव म्हणून देखील त्या जबाबदारी सांभाळत आहेत. सन १९९६ मध्ये गोदावरी फाउंडेशनचे छोटेसे रोपटे आपल्या आईच्या नावाने डॉ. उल्हास पाटील यांनी लावले. जळगाव जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण देशाला शैक्षणिक व वैद्यकिय सेवा उपलब्ध करून देत आज आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉ. केतकी पाटील वारसा म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळत पुढे नेत आहे. डॉ. उल्हास पाटील यांच्या राजकीय वारसदार म्हणूनही डॉ. केतकी पाटील यांच्याकडे पाहिले जाते.

त्यांचे वडील डॉ.उल्हास पाटील यांना काँग्रेस पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी रावेर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. त्यावेळी स्टार युवा प्रचारकांमध्ये डॉ.केतकी पाटील यांचाही समावेश होता. त्यानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायतसह अन्य निवडणुकांमध्येही त्यांनी प्रचाराची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे. रावेर लोकसभा मतदार संघात मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठीही त्या प्रयत्नरत असतात. रावेर लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

शिक्षण

संपादन
  • एमबीबीएस (२०१२)
  • एमडी (रेडिओलॉजी, २०१५)

राजकीय व सामाजिक कार्य

संपादन

डॉ. केतकी पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून मतदार संघाच्या कानाकोपऱ्यात वैयक्तिकरित्या स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांची एनजीओ गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातून वर्षभर विविध वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले जाते. महिला सक्षमीकरण, तरुणाईसाठी रोजगार निर्मिती, आदिवासी भागात मोफत वैद्यकीय सेवा, स्त्री भ्रूणहत्येविरोधात जनजागृती, जिल्ह्यातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करणे आदींच्या माध्यमातून डॉ.केतकी पाटील यांची नाळ थेट समाजाशी जुळली आहे.

वडील डॉ.उल्हास पाटील काँग्रेस पक्षाचे माजी खासदार असल्याने राजकारणात सक्रिय असतात. वडिलांचा हा राजकीय वारसा पुढे नेत डॉ.केतकी पाटील देखील राजकीय जीवनात सक्रिय आहेत. वडिलांना जेंव्हा लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तेंव्हा स्टार युवा प्रचारकांमध्ये डॉ.केतकी पाटील यांचाही समावेश होता. त्यानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायतसह अन्य निवडणुकांमध्येही त्यांनी प्रचाराची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे. सध्या त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांचे स्वतंत्र व्हिजन आहे. गावागावात जाऊन ते यावर चर्चा करतात. मतदार संघ पिंजून काढत त्यांनी प्रत्येक गावांना त्यांनी भेटी देत दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे.

उच्च शिक्षित युवा राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

शैक्षणिक कार्य

संपादन

डॉ.केतकी पाटील यांच्या डायनॅमिक व्हिजन अंतर्गत चालवलेल्या संस्था खालीलप्रमाणे आहेत:

  • डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव
  • उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी
  • डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय
  • गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी
  • गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग
  • गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग
  • गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च
  • डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय
  • डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय
  • डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी
  • डॉ. उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालयात
  • डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात डॉ
  • डॉ. वर्षा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
  • गोदावरी संगीत महाविद्यालय
  • गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव
  • डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल भुसावळ
  • डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सावदा

संदर्भ

संपादन
  1. ^ "महिलादिन विशेष : डॉ. केतकी पाटील | Jalgaon Live News". 2022-03-08. 2023-05-24 रोजी पाहिले.
  2. ^ "लोकसभेसाठीच्या 'चौकन्या'".
  3. ^ "डॉ.उल्हास पाटील यांच्याकडून डॉ.केतकी व डॉ.अनिकेतकडे वैद्यकीय सेवेचा वारसा". Lokmat. 2018-12-15. 2023-05-24 रोजी पाहिले.