डेसिडीअरिअस इरॅस्मस
डेसिडीअरिअस इरॅस्मस (जन्म - इ.स. १४६९, मृत्यु - इ.स. १५३६) हा हॅालंड मधील एक महान धर्मसुधारक होता. युरोपातील धार्मिक व सामाजिक चळवळीत त्याचे योगदान महत्त्वाचे आहे. इरॅस्मस हा धर्मशास्त्राचा गाढा अभ्यासक व मानवतावादी विचारवंत होता. त्याने 'मूर्खांची स्तुती' (In Praise of Folly) हा ग्रंथ लिहिला. त्याने तत्कालीन धर्मव्यवस्थेवर उपरोधक टीका केली. त्याच्या टीकेमुळे धर्मसंस्थेला अधिक हानी पोहोचली. तसेच त्याच्या लिखाणातून लोकजागृती घडून आली. त्याच्या प्रयत्नांमुळे युरोपातील धर्म सुधारणा चळवळीला स्फूर्ती मिळाली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |