डेलावेर

(डेलावेअर या पानावरून पुनर्निर्देशित)

डेलावेर (इंग्लिश: Delaware; En-us-Delaware.ogg डेलावेअर ) हे अमेरिका देशामधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले डेलावेर लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४५व्या क्रमांकाचे व सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.

डेलावेर
Delaware
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: पहिले राज्य (द फर्स्ट स्टेट, The First State)
ब्रीदवाक्य: Liberty and Independence
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी डोव्हर
मोठे शहर विल्मिंग्टन
क्षेत्रफळ  अमेरिकेत ४९वा क्रमांक
 - एकूण ६,४५२ किमी² 
  - रुंदी ४८ किमी 
  - लांबी १५४ किमी 
 - % पाणी २१.५
लोकसंख्या  अमेरिकेत ४५वा क्रमांक
 - एकूण ८,९७,९३४ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता १७०.९/किमी² (अमेरिकेत ६वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $५०,१५२
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ७ डिसेंबर १७८७ (१वा क्रमांक)
संक्षेप   US-DE
संकेतस्थळ delaware.gov

डेलावेरच्या पूर्वेला अटलांटिक महासागरन्यू जर्सी, पश्चिमेला व दक्षिणेला मेरीलॅंड व उत्तरेला पेनसिल्व्हेनिया ही राज्ये आहेत. डोव्हर ही डेलावेरची राजधानी तर विल्मिंग्टन हे सर्वात मोठे शहर आहे. डेलावेरच्या एकूण क्षेत्रफळाच्या २२ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.


७ डिसेंबर १७८७ रोजी अमेरिकेची स्थापना करणारे डेलावेर हे पहिले राज्य होते.

मोठी शहरे

संपादन


गॅलरी

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: