डीडी फ्री डिश

(डीडी फ्री डिश डीटीएच या पानावरून पुनर्निर्देशित)


डीडी फ्री डिश ही भारतातील मोफत दूरदर्शन सेवा (इंग्रजी: फ्री-टू-एर सॅटेलाइट टेलिव्हिजन) आहे. हे पूर्वी डीडी डायरेक्ट प्लस म्हणून ओळखले जात होते. ही सेवा भारतातील सरकारी प्रसारक असलेल्या दूरदर्शनच्या मालकीची आहे. 40 दशलक्ष घरांपर्यंत या सेवेची पोहोच आहे, जी देशातील एकूण टीव्ही ग्राहकांच्या 25% पेक्षा जास्त आहे. डीडी फ्री डिश ही ई-लिलावाद्वारे खाजगी प्रसारकांना स्लॉट विकून कमाई करते.

सध्या डीडी फ्री डिशमध्ये ११६ टेलिव्हिजन चॅनेल आहेत, त्यापैकी ९४ चॅनेल हे MPEG-2 फॉरमॅटमध्ये आहेत, तर २२ चॅनेल MPEG-4 फॉरमॅटमध्ये आहेत. इयत्ता १ ते १२ पर्यंत विविध शैक्षणिक टीव्ही चॅनेल हे पीएम ई-विद्या कार्यक्रमांतर्गत चालवले जातात.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "PM eVidya - For Class 1 to 12th Educational Channels Started". Freedish.in - dd free dish channel list 2022, dd free dish channel list (इंग्रजी भाषेत). 2022-07-12 रोजी पाहिले.