डिजिटल इंडिया
भारतातील ऑनलाइन पायाभूत सुविधा
डिजिटल इंडिया मोहीम ही भारत सरकारने सुरू केलेली एक मोहीम आहे. याचा उद्देश, शासकीय सेवा ही प्रत्येक नागरिकांना इलेक्ट्रॉनिकरित्या उपलब्ध करून देणे असा आहे.यासाठी ऑनलाईन आधारभूत संरचना जास्त चांगली करण्यात येत आहे व आंतरजालाची जोडणीपण सुधरविण्यात येत आहे.देशाच्या तांत्रिकक्षेत्रास डिजिटलरित्या उच्च पातळीवर नेणे असाही एक हेतू यामागे आहे.[ संदर्भ हवा ]
ही मोहिम दि. १ जुलै २०१५ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेतर्फे विमोचित करण्यात आली.या योजनेद्वारे, ग्रामीण भारतात उच्च गतीच्या आंतरजालास उपलब्ध करून देणे असाही एक उद्देश आहे.
या योजनेत तीन घटक आहेत:
- डिजिटल आधारभूत संरचना तयार करणे
- डिजिटलरित्या सेवा वितरण
- डिजिटल साक्षरता
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |