आंतरराष्ट्रीय टी२०
(ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय या पानावरून पुनर्निर्देशित)
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० (आं.टी-२०) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) दोन सदस्यांमधील खेळला जाणारा क्रिकेटचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये प्रत्येक संघ २० षटकांचा सामना करतो. ह्या सामन्यांना टॉप-क्लासचा दर्जा असतो आणि ते उच्चतम टी२० मानक असतात. हे सामने ट्वेंटी-२० क्रिकेटच्या नियमांत खेळले जातता. २००५ मध्ये ह्या प्रकाराच्या प्रारंभापासून , आयसीसीचे संपूर्ण सदस्य आणि काही असोसिएट सदस्यांना आं.टी२० संघांचा दर्जा देण्यात आला. एप्रिल २०१८ मध्ये आयसीसीने जाहीर केले की १ जानेवारी २०१९ पासून सर्वच्या सर्व १०५ सदस्यांना आंतरराष्ट्रीय टी२० संघाचा दर्जा देण्यात येईल.
Learn more हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |